मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पूर्ण हनुमान चालिसा (hanuman chalisa) वाचण्याची गरज नाही. त्यांनी फक्त चार लाईन वाचाव्यात. त्यांनी या ओळी तोंडपाठ सांगाव्या. फक्त बाळासाहेबांच्या विचारावर ते मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री झाला आहे. मला वाटतं लाभ घेण्याची सवय त्यांच्या पिढीला आहे. आम्हाला नाही, असं आव्हानच नवनीत राणा (navneet rana) यांनी दिलं. आता निवडणुका नाहीत. त्यामुळे हा स्टंट नाही. निवडणुकीच्या तोंडावर असं काही केलं असतं तर स्टंट समजला गेला असता. मी त्यांच्याच उमेदवारांना पाडून निवडून आले आहे. त्यामुळे मला कुणी शिकवू नये. 16-16 तास काम केल्यानंतर मला निवडून दिलं आहे. राऊतांना मी पोपटचं म्हणते . ते सकाळीसकाळी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही भाजपच्या बाजूने आहोत हे म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. तुम्ही आम्हाला म्हणता तुम्ही कुणाच्या भरवश्यावर निवडून आलाय. पण तुम्ही तर मोदींच्या फोटोवर निवडून आलाय. त्याचं काय? असा घणाघाती हल्लाही नवनीत राणा यांनी केला.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत आले आहेत. उद्या ते मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसैनिक रस्त्यावर बसले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालिसा वाचायला सांगावा. हनुमान जयंतीच्या दिवशी उद्धव ठाकरे हनुमान मंदिरात गेले नाही. वीजेचं संकट आहे, बेरोजगारी आहे, शेतकरी शेतमजूरांचा प्रश्न आहे. त्यावर भाष्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालयात दोन वर्षानंतर आले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा ढीग आहे. मग मुख्यमंत्र्यांना किती काम असेल तरीही ते मंत्रालयात येत नाहीत, अशी टीका नवनीत राण यांनी केली.
बाळासाहेबांनी पदासाठी विचारधारा मरू दिली नाही. समाजासाठी विचार केला आहे. बाळासाहेबांची तिसरी पिढी मंत्रीपदावर जगत आहे. राजकीय पोळ्या भागत आहे. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच. इथेच वाढले. मी विदर्भाची सून आहे. हनुमान माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे शिवसैनिक माझं काही करू शकत नाही. शिवसेनेची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या पार्टीचे लोक अशी विधाने करत असतील तर कायदा सुव्यवस्था भंग करण्याचं काम शिवसैनिक करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी पेशन्स ठेवले नाही. एवढं कष्ट करण्यापेक्षा दोन पावलं पुढे या. मुख्यमंत्र्यांना सांगा कायदा सुव्यवस्था का बिघडवता. मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार. शिवसैनिकात दम आहे की हनुमान चालिसाच्या नावामागे दम आहे हे पाहावं लागेल. बाळासाहेब निघून गेले त्यांच्यासोबत त्यांची विचारधाराही निघून गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संबंधित बातम्या: