मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार, लहान मुलांनी काळजी करु नका : मुख्यमंत्री

| Updated on: Apr 19, 2020 | 2:12 PM

आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद (Cm Uddhav Thackeray Corona Virus) साधला. 

मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार, लहान मुलांनी काळजी करु नका : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा  3 हजारच्या पार गेला आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला (Cm Uddhav Thackeray Corona Virus) आहे. या पार्श्वभूमीवर आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.

“मी चांगले काम करतो म्हणून कौतुक करीत आहात. पण आपण टीकाही केली तरी महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घ्यायला. ही आरोग्य आणीबाणी आहे आणि त्यात मला धोका पत्करायचा नाही. कारण मला (Cm Uddhav Thackeray Corona Virus) राज्यावर आलेले संकट संपावयाचं आहे. मुंबई पुण्यात कोरोना रुग्ण वाढणे हे धोकादायक आहे. मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्या बालगोपाळांनी आपल्या वाढदिवसाचे किंवा खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले, त्यांचे कौतुक, तुम्ही काळजी करु नका, सरकार खंबीर आहे, चिमुरड्यांनी आपले पैसे स्वतःजवळच ठेवावे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

सर्दी, खोकल्याची लक्षण असणाऱ्यांनी फिव्हर क्लिनिकमध्ये जा

आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे. पण न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरु आहे. लतादीदींच्या गाण्याची आठवण झाली, सरणार कधी रण… शत्रू दिसत असता, तर हिंदुस्थानी जनतेने एक घाव घालून दोन तुकडे केले असते, मात्र हा अदृश्य शत्रू आपल्याच माणसाच्या माध्यमातून वार करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

नॉन-कोविड रुग्णांच्या म्हणजे किडनी किंवा इतर विकार असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी दवाखाने खुले ठेवा. सर्दी खोकला ताप अशी कोणतेही लक्षण दिसली तर ती लपवू नका. जर लक्षण दिसतं असतील तर लोकं वाळीत टाकतील का? असा प्रवृत्तीचा महाराष्ट्र नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तुम्ही घरी उपचार करु नका, फीव्हर क्लिनिकला भेट द्या, कोरोना झाला म्हणजे सगळे संपलं नाही, वेळेत आलेले चिमुकले ते वृद्ध बरे होतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात पीपीई किटचा तुटवडा

“राज्यात पीपीई किटचा थोडासा तुटवडा आहे. मी खोटं बोलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार पीपीई किट देत आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना सुरु होऊन सहा आठवडे होत आले. मी नम्रपणे काही माहिती सांगतो आहे. आता हा आकडा पुढे सरकतो आहे. हा टेस्टचा आकडा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 66 हजार 796 टेस्ट झाल्या. यात 95 टक्के लोक हे निगेटिव्ह आल्या आहेत. या टेस्टनंतर 3 हजार 600 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. काही लोकांना बरं करुन घरी सोडलं आहे. जेवढे पॉझिटिव्ह लोक सापडतात ते लोक अति सौम्य किंवा ज्यांना लक्षण नाही अशी लोक आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

ग्रीन-ऑरेंज झोनमधील उद्योगांना परवानगी

“महाराष्ट्र आणि मुंबई यातील आकड्यात काहीशी घट झाली आहे. पण इतक्यात भ्रमात राहायचं नाही,आकडे वरखाली होत राहतात. मी तपास करण्यास सांगितले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थचक्र रुतलं आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर येताना आर्थिक संकट नको. म्हणून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील काही उद्योगधंद्यांना परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला अजूनही परवानगी नाही. काही  जिल्ह्यातच मालाची ये-जा करण्यास माफक परवानगी दिली जाईल. तुम्ही जिल्ह्यातील जिल्ह्यात ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

घरोघरी वर्तमानपत्र वितरण नको

मुंबई पुण्यात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे तुम्ही घरातच बसायचं आहे. पत्रकार बांधवाना सांगतोय. वितरणावर बंदी नाही. स्टॉल्सला परवानगी आहे. मात्र घरी वितरण नको. पुणे -मुंबईत अद्याप वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यास संमती नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

“काहीही न करता शांत बसून राहणं यापेक्षा दुसरी शिक्षा नाही. हळूहळू शिथीलता आणायची आहे. लगेचच सर्व सुरु करणार नाही. शेती आणि कृषीमध्ये आधीही बंधन नव्हतं आताही येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी अजून उघडणार नाही,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“जिल्ह्यातील जिल्ह्यात तुम्ही ये-जा करु शकता. पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात येऊ शकत नाही. काही जणांच्या मनासारखं करतात. ते कौतुक करतात. पण मी काही जणांच्या मनासारखं करत नाही ते मला बोलतात,” असाही टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवर अत्याचार

“जर तुम्ही वेळेत आला तर नक्की बरं होता येते. काही जणांना घरी सोडलं आहे. पण तुम्ही वेळेत आला पाहिजेत,” असेही ते म्हणाले.

या लॉकडाऊन कालावधीत घराघरात महिलांवरील अत्याचार होता कामा नये, असे होत असेल तर महिलांना मी विनंती करतोय तर 100 नंबर फिरवा. याशिवाय मानसिकरीत्या अस्वस्थता वाढली असेल आणि समुपदेशनाची गरज असेल तर मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या 1800-120-8200- 50 क्रमांकावर तसेच आदिवासी विकास विभाग / प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुलता यांच्या 1800-102-4040 क्रमांकावर जरूर संपर्क साधा,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालिकेतील डॉक्टरांनी तसेच इतर तज्ज्ञ टीमशी संवाद साधला. तसेच उद्यापासून काही जिल्ह्यातील लॉकडाऊन हा शिथील करण्यात येणार आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली.

राज्यात कोरोना रुग्णांची स्थिती काय?

राज्यात कालच्या दिवसात ‘कोरोना’चे 11 बळी गेले, तर एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे 328 नव्या ‘कोरोना’ रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रात आता 3 हजार 648 कोरोनाग्रस्त असून राज्यातल्या ‘कोरोना’बळींची संख्या 211 वर गेली आहे. राज्यात काल 34 रुग्ण बरे झाले असून एकूण 365 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 हजार 468 कोरोना टेस्ट झाल्या असून 63 हजार 476 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पुण्यात काल सर्वाधिक ‘कोरोना’ रुग्णांची नोंद झाली. पु्ण्यात काल 78 नवे रुग्ण सापडले. पुण्यातली एकूण रुग्णसंख्या आता 612 वर गेली आहे. पुण्यात काल ‘कोरोना’मुळे एक रुग्ण दगावला.

संबंधित बातम्या :

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित

Corona Update | कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं, 80 टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

कोरोनाला रोखण्याठी केवळ लॉकडाऊन उपाय नाही, टेस्टिंग वाढवा : राहुल गांधी