मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात (CM Uddhav Thackeray on Migrant workers) आलं आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, बिहार यासह अनेक ठिकाणचे मजूर हे महाराष्ट्रात अडकले आहे. यातील अनेकांनी प्रशासनाला घरी जाण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (26 एप्रिल) सर्व जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “परराज्यातील मजूरांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवलं जाईल,” असे सांगितले.
“परराज्यातील जे मजूर घरी जाऊ इच्छितात, त्यांना मी सांगू इच्छितो, आमचं बोलणं सुरु आहे. लवकरात लवकर यावर उपाय काढण्यात येईल,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“पण एक गोष्ट नक्की ट्रेन सुरु होणार नाही, कारण कोणत्याही प्रकारची गर्दी करायची नाही. जर गर्दी झाली तर पुन्हा निर्बंध लावावे लागतील. ज्या काही सूचना सरकारकडून मिळतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. जेव्हा कधी शक्य असेल तेव्हा सर्वांना आपपल्या गावी घरी पाठवू,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी (CM Uddhav Thackeray on Migrant workers) सांगितले.
“महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहार ही राज्य एकमेकांची मदत करताना हे अदान प्रदान करु. राजस्थानच्या कोटामध्ये काही विद्यार्थी अडकले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. केंद्रासोबत चर्चा सुरु आहे. लवकरच यावर तोडगा काढू. जे शक्य आहे ते करु पण ते संयमाने करण्याची गरज आहे. नाहीतर जर पुन्हा गर्दी झाली तर आतापर्यंतची जी तपश्चर्या आहे ती मग लॉकडाऊन कशाला केला?” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या
“महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. जवळपास 1 लाख 8 हजार 972 चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. त्यातील 1 लाख 1 हजार 62 रुग्ण निगेटिव्ह ठरले आहेत. तर 7 हजार 628 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 323 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे,” अशीही माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.
आपला विश्वास हेच आमचं बळ
“जगभरात सध्या एकच चर्चा आहे की भारत हे युद्ध औषध येण्यापूर्वी जिंकेल. कारण ते हिमतीवर, धैर्यावर मनोबलवर हे युद्ध जिंकेल असा सर्वांचा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास असेल तर समोर संकटांचा डोंगर जरी असला तरी तो आपण जमीनदोस्त करु शकता. तेवढा आत्मविश्वास आपल्यात आहे.” असेही उद्धव ठाकरे म्हणाले
“आत्मविश्वाच्या बळावर आपण हे युद्ध जिंकू शकतो जेवढी खबरदारी आपण घेता आहात ती अतुलनीय आहे. जो संयम दाखवता तो अद्भ्ुत आहे. हे तुम्ही दाखवत आहात म्हणून आम्ही हे युद्ध लढू शकतो. आपला विश्वास आपले आशिर्वाद हेच आमच बळ, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी (CM Uddhav Thackeray on Migrant workers) सांगितले.
संबंधित बातम्या :