Maharashtra Budget 2022: राज्यात CNG होणार स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा काय?

| Updated on: Mar 11, 2022 | 4:57 PM

अजित पवार म्हणाले की, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असल्याचे सांगितले आहे, असा उल्लेख करूनही अजित दादांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का दिला.

Maharashtra Budget 2022: राज्यात CNG होणार स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा काय?
अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला.
Follow us on

मुंबईः युद्धाचे सावट, त्यात भडकणारे इंधन दर आणि महागाईच्या कचाट्यात सापडलेले सामान्य नागरिक यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. महाराष्ट्राच्या (Maharashtra) अर्थसंकल्पात अर्थमंत्री (Finance Minister) अजित पवार (Ajit Pawar) यांनी सीएनजीवरच्या व्हॅटमध्ये घट करण्याची घोषणा केलीय. अजित पवार म्हणाले की, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असल्याचे सांगितले आहे, असा उल्लेख करूनही त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का दिला. सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव यावेळी मांडला. या निर्णयामुळे सरकारचा 800 कोटींचा महसूल बुडेल. मात्र, सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो. त्याचा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांनाही मोठा लाभ होतो. आता व्हॅटमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव असल्याने त्याचा थेट सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, आज अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांची घोषणांचा बार उडवला.

अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणाः

  1. नाशिक, मुंबई, नागपूरमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार. तसेच वैद्यकीय प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार. देशातील होतकरू युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळण्यासाठी हा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येईल. मुंबई येथे सेंट जॉर्ज येथे पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था आणि नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार.
  2. महाविकास आघाडी सरकार यंदाच्या वर्षात महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांचा योजनेत 30 टक्के सहभाग होता. तो वाढवून 50 टक्के पर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे महिलांचे शेती व्यवसायातील योगदान वाढणार आहे. तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांसाठी देण्यात येणार आहे. कोकण विद्यापीठ आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांना 50 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांना संशोधनासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  3. मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी. सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार. 8 कोटी रुपये खर्च करून 8 मोबाइल कर्करोग निदान वाहने सुरू करणार. सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार. टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन देणार. प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय उभारणार. त्यासाठी 3 हजार 183 कोटींचा निधी. पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार. येथे सगळेच उपचार एका छताखाली मिळणार.
  4. पुण्याजवळील हवेली येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी 25 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार. त्यासाठी 100 कोटींचा निधी देणार. तर येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा. येत्या दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देणार. पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार. जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
  5. भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शेततळ्याच्या अनुदानात वाढ करणार. देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार. प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प उभारणार. या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य. मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!