मुंबईतील मालाडमध्ये काही दिवसांपूर्वी मानवी बोट आढळल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तर आताच याच उपनगरात कोल्ड कॉपीमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकाला मोठा शॉक बसला. शुक्रवारी रात्री हा प्रकार समोर आला. ही बाब ग्राहकाने हॉटेल मालकाच्या निदर्शनास आणून दिली. पण त्याने आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. ग्राहकाने थेट पोलीस ठाणे गाठत याप्रकाराविषयी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि कामगारावर गुन्हा दाखल केला.
ग्राहकाची ‘होप’च संपली
अंधेरीमध्ये वास्तव्यास असलेले तक्रारदार प्रतिक रावत (२५) मालाड इन्फिनिटी मॉल परिसरातील होप अँड शाईन लाऊंज या रेस्टॉरन्टमध्ये शुक्रवारी रात्री मित्रासोबत कोल्ड कॉफी पिण्यासाठी गेले होते. त्यांनी कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. थोड्यावेळाने वेटर दोघांसाठी कॉपी घेऊन आला. त्यावेळी त्यांची कॉफी कडवट वाटल्यामुळे त्यांनी ती थोडी गोड करून आणण्यास सांगितले. गणेश केकान मित्राने ही कॉफी अर्ध्याच्यावर संपवली. त्यावेळी रावत यांना ग्लासात काही दिसले. त्यानी बारकाईने पाहिले असता ते झुरळ असल्याचे आढळले
व्यवस्थापकाने केले हातवर
दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर या दोघांनी वेटरला बोलावून घेतले. त्याला या प्रकाराबद्दल जाब विचारला. त्यावेळी त्याने कानावर हात ठेवला. या दोघांनी नंतर व्यवस्थापकाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्याने पण त्यांना योग्य उत्तर दिले नाही. दोघांनी पण समाधानकारक उत्तर दिले नाही. चूक झाल्याची कबुली दिली नाही. त्यानाराजीने प्रतिक रावत आणि त्याचा मित्राने थेट मालाड पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेल्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढला होता. तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली. मालाड येथील हॉटेलमध्ये ग्राहकाने मागविलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. तात्काळ त्याचे छायाचित्र काढून ही बाब हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली. पण त्यांनी ते मान्य केले नाही, मात्र छायाचित्रच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.