मुंबई : मेट्रो प्रकल्प तयार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील (Save Aarey) 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या या निर्णयाचा मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. त्यासोबतच कॉमेडी स्टार राजपाल यादव (Rajpal yadav) आणि त्याच्या 6 वर्षाच्या मुलीनेही पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला. राजपाल यादव याने सोशल मीडियावर आपल्या मुलीचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने सेव्ह आरेचा नारा दिला आहे.
आरे वाचवा मोहीमेत बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसह (Shraddha Kapoor) अनेक सेलिब्रिटिंनीही पाठिंबा दिला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे (Amit thackeray) यांनीही आरेतील झाडे वाचवण्यासाठी जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे.
Development is important but at what cost?!?!? As it is we have so few green spaces in Mumbai and Aarey is providing us a large portion of our oxygen. We need to rethink this decision to cut down trees like this. Save Aarey Forest!#SaveAareyForest #SaveAarey #SaveAareySaveMumbai pic.twitter.com/r2Nk22PWSJ
— Rajpal Yadav (@rajpalofficial) September 8, 2019
नुकतेच मुंबईकरांनी मानवी साखळी करुन आरे वाचवण्यासाठी सरकारला साकडं घातलं. आरेच्या जंगलात साडे चार लाखांपेक्षा जास्त झाडे असून हे अनेक प्राणी-पक्षी प्रजातींसाठी हक्काचं घर आहे. या झाडांसोबतच या जीवांचंही अस्तित्व संपुष्टात येईल यात शंका नाही. त्यामुळे या जंगलाची जैवविविधताच संपुष्टात येणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.
मुंबईचं फुफ्फुस असलेलं आरे जंगल भविष्यातील पिढ्यांचीही महत्त्वाची संपत्ती आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचाही क्रमांक लागतो. मुंबईकरांना स्वच्छ श्वास द्यायचा असेल, तर झाडं तोडणं नव्हे, झाडांची संख्या वाढवणे हा पर्याय असल्याचं तज्ञांचं मत आहे.