मुंबई : आई, वडिलांना शिव्या देणं हे अत्यंत चुकीचं आहे. चंद्रकांत दादांनी महाराष्ट्रात आई-वडिलांना शिव्या द्या, असं सांगणं योग्य नाही. मोदी, शहांची तुलना आई-वडिलांशी करणं हेही चुकीचं आहे. मोदी, शहा हे राजकारणी आहेत. आई-वडिलांना शिव्या दिल्या तर चालतील. पण, मोदी, शहांना देऊ नका, हे योग्य नाही. मोदी, शहांकडील हट्ट हा वेगळ्या आशयाचा असू शकतो. आई-वडिलांकडं केलेला हट्ट हा वेगळ्या आशयाचा असू शकतो. असं मत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेचे काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी पक्ष बदलविण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जाऊ शकतो.
निवडणूक जवळ आली की, काही विधान केली जातात. त्यांना चुचकारणं असं असू शकतं. जे सामाजिक घटक आहेत. ज्यांच्यावर हजारो वर्ष अन्याय झाला, त्यासाठी आरक्षणाचा मार्ग आणला गेला. त्यामुळं गरीब लोकांना पुढं येण्याची संधी मिळाली.
शिवतीर्थावर मेळावा झालात. त्यातून खरी शिवसेना कोणाची आहे. हे स्पष्ट झालं. उद्धव ठाकरे शांत,संयमी होते. खरी शिवसेनी ही ठाकरेंची आहे. धनुष्यबाणही ठाकरेंना द्यावं लागेल. अशी भूमिका घेतली नाही, तर निवडणूक आयोगाला विरोध होईल.
बसमध्ये कोंबून मुंबईला आणणं. येण्या-जाण्याचा खर्च कुणी केला. पैसे कुठून आले. याची चौकशी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. येवढा प्रचंड खर्च हा काही लोकं कशी करतील. याचं समाजात एक दिवस आश्चर्य वाटायला लागेल, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.
सिल्व्हर ओकवर हल्ला करणाऱ्यांना कुणी पाठविलं. ते कसे आले. अशा प्रकारे हल्ला करण्याची पद्धत महाराष्ट्रात नव्हती. ती सुरू कुणी केली, हे अद्याप स्पष्ट नाही. पण, जे आले त्यांना अटक झाली.
आता त्यांना पुन्हा संरक्षण देणं. पुन्हा कामावर घेणं. याचा अर्थ जाहीर आहे की, त्यांना सहानुभूती कुणाची होती. त्यांना सिल्व्हर ओकला कुणी पाठविलं होतं, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.