Sharad Pawar : काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही? शरद पवार स्पष्टच म्हणाले….

| Updated on: Jul 03, 2023 | 4:27 PM

Sharad Pawar : आज सोमवारी कराडमधील प्रीती संगमावर जात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Sharad Pawar : काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही? शरद पवार स्पष्टच म्हणाले....
Follow us on

मुंबई : राज्यातल राजकीय समीकरण अशा पद्धतीने बदलतील याची कोणी कल्पनाही केली नसावी. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडून दाखवले. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवार यांनील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत इतिहास रचला. मात्र आता सर्वेसर्वा शरद पवार स्वत: मैदानात उतरल्याने पुन्हा एकदा काही ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सोमवारी कराडमधील प्रीती संगमावर जात शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

ज्या पक्षाकडे जास्त सदस्य आहेत त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. माझ्या माहितीनुसार आता विधानसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता या पदासाठी त्यांनी मागणी केली असेल तर ती मागणी रास्त असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी अजित पवारांना फटकारलं आहे. आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही, कुणालाही अपात्र करणार नसून मी त्या रस्त्यानेच जाणार नसल्याचं शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. आज देशात भाजपच्या माध्यमातून समाजात जातीजातीत, धर्माधर्मात एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेसाठी प्रयत्न करणं ही आमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे, असंहा पवार म्हणाले.

अजित पवार यांनी सांगितल्यानुसार शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीकडूनज जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाहीतर राष्ट्रवादीच्या प्रतोदपदीसुद्धा जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.