या दिग्गज अभिनेत्याने बाबा सिद्धीकी यांना राजकारणात आणले, बॉलीवूडशी करुन दिली ओळख

| Updated on: Oct 13, 2024 | 8:33 PM

बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध असलेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला. त्यांचा मुलगा जीशान सिद्धीकी याच्या वांद्रे ईस्ट येथील कार्यालयाबाहेरच तिघा मारेकऱ्यांनी गोळ्या घालून त्यांची निघृण हत्या केली. या प्रकरणात गुरमैल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा), तर दुसरा धर्मराज राजेश कश्यप (19, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना अटक झाली असून तिसरा आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी काही पथके महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.

या  दिग्गज अभिनेत्याने बाबा सिद्धीकी यांना राजकारणात आणले, बॉलीवूडशी करुन दिली ओळख
baba Siddique
Follow us on

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळच शनिवारी गोळीबार करुन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर बाबा सिद्धीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलीवूडची नामीगिरामी हस्ती पोहचल्या होत्या.सुनील दत्त यांची कन्या कॉंग्रेस नेता प्रिया दत्त यांनी बाबा सिद्धीकी यांच्या हत्येने आपण स्तब्ध झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. बाबा सिद्धीकी आमचे राजकीय सहकारीच नाहीत तर एक कौटुंबिक सदस्य होते. माझे वडील त्यांना मुलाप्रमाणे मानायचे. मला ते भावा प्रमाणे होते, एक चांगले प्रेमळ मित्र होते असे प्रिया दत्त यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

बाबा सिद्दीकी यांनी एकमेकांचे कट्टर विरोधक झालेल्या सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांना एकत्र आणून त्यांच्या समेट घडविण्यात आला आहे.साल 2013 मधील सर्वाधिक व्हायरल झालेला हा प्रसंग म्हटला जातो. बाबा सिद्धीकी हिंदी सिनेमातील दिग्गज कलाकार सुनील दत्त यांचे शिष्य होते. त्यांचे दुसरे पूत्र असे त्यांना म्हटले जात असे. अनेक बॉलीवूडच्या हस्ती बाबा सिद्धीकी यांच्या पार्ट्यांना हजर राहत असत. यात सलमान खान, शाहरूख खान, निर्माता कबीर खान, सेलिब्रिटी डिझाइनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, कॅटरीना कैफ, हुमा कुरेशी, सोनू सूद, सुशांत सिंह राजपूत, अंकिता लोखंडे, कियारा आडवाणी, आर. माधवन आणि अदिती राव हैदरी सारखे कलाकारांचा समावेश आहे.

बाबा सिद्दीकी यांनी कोविड-19 साथी नागरिकांना जीवनावश्यक औषेधे पुरविल्याने त्यांचे कौतूक झाले होते. दिवंगत कॉंग्रेस खासदार सुनील दत्त यांनीच त्यांना राजकारणात आणले. बाबा सिद्धीकी लागोपाठ पाच वेळा मुंबई- उत्तर लोकसभा मतदार संघातून निवडून आले. बाबा सिद्धीकी साल 1977 मध्ये कॉलेजवस्थेत कॉंग्रेसचे कार्यकर्ते झाले. बाबा सिद्धीकी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजितदादा यांच्या गटात प्रवेश करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

हे सुद्धा वाचा

प्रिया दत्त यांची पोस्ट

प्रिया दत्त यांनी लिहीले की बाबा सिद्धीकी आपल्या राजकीय करियरमध्ये माझे वडील सुनील दत्त यांच्या सोबत राहीले. मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांनी राजकारणातील चढ-उतारात मला मार्गदर्शन केले. आपला खंबीरपणे पाठींबा दिला. त्यांचे असे अचानक निघून जाणे, एका कुटुंबातील सदस्य गेल्यासारखेच आपल्याला वाटले. जीशान आणि आर्शिया यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. देव त्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची ताकद देवो अशी पोस्ट प्रिया दत्त यांनी केली आहे.

सुनील दत्त यांनी राजकारणात आणले

सुनील दत्त यांच्या शिफारसीने बाबा सिद्धीकी यांना साल 1999 मध्ये वांद्रे पश्चिम येथील आमदारकीचे तिकीट मिळाले. तीन वेळा ते निवडून आले. त्यांचा राजकारणाशीच नव्हे तर बॉलीवूडशी देखील त्यांनी परिचय करुन दिल्याने प्रिया दत्त यांनी म्हटले आहे.बाबा सिद्धीकी यांच्या गोळीबार झाल्यानंतर संजय दत्त लिलावीत रुग्णालयात धाव घेतली होती. सलमान खान, शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांनी रुग्णालयात जाऊन बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.