कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणाव निर्माना झाला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भाजप सरकार असताना तुम्ही का गप्प होते. आता कॉंग्रेसचं सरकार आहे म्हणून हे टीका करतात. ‘मोदी है तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?, असा सवाल पटोलेंनी केलाय.
भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते का आले आम्हाला माहिती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. देशपातळीवर महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या कामकाजाच कौतुक देशभरात केलं जातं. आजची निवड, राहुल नार्वेकरांची आम्ही परंपरेनुसार केली आहे, असं नाना पटोले म्हणाले. विधिमंडळ परिसरात नाना पटोले माध्यमांशी बोलत होते.
कामकाज समितीची मिटींग आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर आम्ही काल भूमिका मांडली. विधानसभेच्या उपाध्यक्ष हा विरोधी पक्षचा व्हावा अशी आमची भूमिका आहे. जेव्हा महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे केवळ 6-7 आमदार होते. तेव्हाही विरोधी पक्षेनेता मिळाला आहे. नागपुरच्या अधिवेशनात विरोधीपक्षनेता ठरला जाईल, असं पटोलेंनी म्हटलं आहे.
बहुमताची मस्ती या लोकांत आहे. अभिनंदनावर चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र सरकारला पाशवी बहुमताची मस्ती चढली आहे. मारकडवाडी असेल की महाराष्ट्रातील अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेणं सुरू आहे. लोकांना या प्रक्रियेवर संशय आहे, असं नाना पटोले म्हणालेत. प्रेमाचा विषय नाही. आम्ही दोघंही एकाच वेळी, एकाच भागातून आम्ही सदस्य आहोत. माझी आणि फडणवीसांची मैत्री जगजाहीर आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं.