मुंबई: लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. चार दिवस लसीकरण बंद ठेवायचं. त्यानंतर लसीकरण करून रेकॉर्ड निर्माण केल्याचा दावा करायचा हा निव्वळ पोरखेळ आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केली आहे. (congress leader prithviraj chavan slams modi government over vaccination)
पृथ्वीराज चव्हाण यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही टीका केली आहे. मोदींना रेकॉर्ड करायची, इव्हेंट करायची आणि प्रसिद्धीची हौस आहे. आता त्यांनी लसीकरणाचा रेकॉर्ड केल्याचा दावा केला आहे. तीन चार दिवस लसीकरण थांबवायचं. नंतर एकाच दिवशी लसीकरण करून रेकॉर्ड केल्याचा दावा करायचा हा पोरखेळ आहे. लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे, अशी टीका करतानाच देशात डिसेंबरपर्यंत लसीकरण करायचे असेल तर 200 कोटी डोस लागणार आहेत. पण सरकारची तशी तयारी दिसत नाही, असं चव्हाण म्हणाले.
मोदी सरकारचा नुकताच विस्तार झाला. त्यात भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज आहेत. याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं, कुणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. मंत्रिमंडळात संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. मात्र, ही नाराजी काही दिवस चालत राहते, असंही ते म्हणाले.
मोदींनी काही मंत्र्यांचा राजीनामा घेतला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी काही मंत्र्यांची हकालपट्टी केली. सात वर्षे या लोकांना पदावर ठेवण्यात आलं होतं. आता अचानक हे मंत्री कुचकामी ठरले हे त्यांच्या लक्षात आलं का? इतके दिवस त्यांना मंत्रिमंडळात का ठेवलं? असा सवाल करतानाच देशाचा आणि प्रशासनाचा खेळखंडोबा करण्यात आला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते आपल्या पद्धतीने काम करत आहेत. पण महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. (congress leader prithviraj chavan slams modi government over vaccination)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |https://t.co/B59SHuz9oC#News | #NewsUpdates |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांचा टोला
मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष वार
(congress leader prithviraj chavan slams modi government over vaccination)