गृहमंत्री कुठे व्यस्त आहेत कुणास ठाऊक? वसई हत्या प्रकरणावरून वर्षा गायकडवाड यांचा सरकारवर निशाणा

| Updated on: Jun 18, 2024 | 11:37 PM

वसई हत्या प्रकरणाने खळबळ उडाली होती, भरदिवसा तरूणाने आपल्याचं प्रेयसीला संपवलं. दिवसाढवळ्या अशी हत्या झाल्याने काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय.

गृहमंत्री कुठे व्यस्त आहेत कुणास ठाऊक? वसई हत्या प्रकरणावरून वर्षा गायकडवाड यांचा सरकारवर निशाणा
वर्षा गायकवाड
Image Credit source: Facebook
Follow us on

वसईमध्ये मंगळवारची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली. एक तरूणाने आपल्या प्रेयसीचीच हत्या केली. आरोपी रोहित यादव याने आपल्याच प्रेयसीवर पान्याने हल्ला केला. भरदिवसा त्याने प्रेयसी आरतीची हत्या केली, त्याला कायद्याचा धाक ना पोलिसांची भीती कशाचीच परवा नव्हती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी थेट राज्य सरकारवर टीका केली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राज्यात ठिकठिकाणी बोंबाबोंब असल्याने गुन्हेगारी चौका-चौकात डोके वर काढताना दिसत आहे. यात खून होतोय तो माणुसकीचा. वसईत एका माथेफिरूने तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. चिंतेची बाब म्हणजे ये-जा करणारे लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते, हे अतिशय वेदनादायी आहे, असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

कायद्याने गुन्हेगारीवर आपली पकड सैल केलीय म्हणूनच गुन्हेगारांना त्याचा जराही धाक राहिला नाही, ही बाब वारंवार अधोरेखित होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात हे सरकार असक्षम ठरत आहे, हे सपशेल दिसत आहे. गुन्हेगारी थैमान घालत असताना, सर्वसामान्य भीतीच्या सावटाखाली जगत असताना राज्याचे गृहमंत्री मात्र कुठे व्यस्त आहेत कुणास ठाऊक? असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

नेमकं काय आहे प्रकरण?

रोहित यादव आणि आरती यादव यांचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसलं होतं. रोहितला संशय होता की आरतीचे बाहेर इतर दुसऱ्या कोणासोबत संबंध आहेत. आरतीच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने ती गेल्या महिन्यामध्ये वसईमधील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी रोजच्याप्रमाणे की कामावर निघाली होती, गावराई पाडा येथील स्टेट बँके समोर त्याने आरतील अडवलं. दोघांमध्ये वाद झाला मात्र काही वेळाने रोहितने आपल्या जवळील पान्ह्याने तिच्या डोक्यात गंभीर घाव घातले. तो इतक्या जोरात घाव घालत होता की आरतीचा जागेवरच मृत्यू झाला.