Rajeev Satav : राजीव सातव यांचे जाणे दुःखद आणि क्लेशदायी : अरविंद सावंत

| Updated on: May 16, 2021 | 11:59 PM

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले.

Rajeev Satav : राजीव सातव यांचे जाणे दुःखद आणि क्लेशदायी : अरविंद सावंत
राजीव सातव
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव  (Congress MP Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये (Pune Jehangir hospital) राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.  राजीव सातव यांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून हिंगोलीकडे रवाना करण्यात आलं आहे.  (Congress Rajya Sabha MP Rajeev Satav died due to corona live updates and political leaders reactions)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 May 2021 04:19 PM (IST)

    राजीव सातव यांचे जाणे दुःखद आणि क्लेशदायी : अरविंद सावंत

    मुंबई : खासदार राजी यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी  “कोण हा काळ ? कोरोना एखाद्या यमासारखा माणसे टिपत चाललाय. उमलणाऱ्या कळ्या कुस्करत कोरोना निर्दयी वाटचाल करतोय. आज राजकारण समाजकारणतील एक उमदे व्यक्तिमत्व आम्हास सोडून गेले. राजीवच्या मातोश्री रजनी सातव आणि मी एकाच काळात विधानपरिषदेत आमदार होतो. राजीवला काही भूमिका मांडायची असेल तर अगदी निर्मळ पणे विचारत असे. कधी मनात आले नाही की मी शिवसेनेचा आहे कसे विचारू. काही विषय हे राजकारणापलीकडचे असतात. त्यावर जनहिताची भूमिका घेणे आवश्यक असते. यावर त्यांचा विश्वास होता. ते नेहमी भेटत असत. अतिशय विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्व. आम्ही सत्तेत होतो पण त्यामुळे मैत्रीत कधी अंतर पडले नाही. राजीव, सुप्रिया सुळे हे तेव्हाही काही बरे वाईट असले किंवा दिसले की वैचारिक आदान, प्रदान व्हायचे. राजीव सातव लोभस होते. राहुल गांधींच्या ते खूप जवळचे होते. पण त्याचा अहंकार कधीच दाखविला नाही. अनेक राज्यात काँग्रेस च्या प्रचाराला जात. तेथून आठवण आली की संपर्क करायचा. राहुल गांधीचे निष्ठावंत समर्थक होते.काँग्रेस मध्ये अंतर्गत मतभिन्नता येताच 2019 साली त्यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. पण काँग्रेसने त्यांचा दिलदारपणा आणि त्यागाची दखल घेत त्यांना राज्यसभेवर पाठविले. अलीकडे दुर्मिळ झालेली राजकारणापलीकडील मैत्री जपणारा हा उमदा, लोभस, सौजन्यशील राजीव आमच्यातून निघून नाही त्याला काळाने हिरावून घेतलय,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली.

  • 16 May 2021 03:23 PM (IST)

    सातव यांच्या जाण्याने राजकारणात फार मोठी पोकळी – शशिकांत शिंदे

    मुंबई : महाराष्ट्रातील उभरते नेतृत्व आणि राहुल गांधी यांचे हक्काचे शिलेदार राजीव सातव त्यांच्याकडून राज्याला किंबहुना काँग्रेस पक्षाला खूप अपेक्षा होत्या. त्यांचे असे जाणे मनाला पटणारे नाही. त्याच्या जाण्याने धक्काच बसला आहे. संकटकाळी पक्षाला वाचवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. ही फक्त काँग्रेस पक्षाची नाही तर राज्याच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.


  • 16 May 2021 02:31 PM (IST)

    मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला: पंकजा मुंडे

  • 16 May 2021 01:03 PM (IST)

    खासदार राजीव सातव यांच्या जाण्यानं अभ्यासू उमदा मित्र हरपला: हर्षवर्धन पाटील

    खासदार राजीव सातव यांची प्रारंभापासूनची राजकीय कारकिर्द मी जवळून पहिली आहे. सामाजिक जाण असलेले सुसंस्कृत असे हे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने अतिशय अभ्यासू उमदा मित्र हरपला आहे, या शब्दात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

    विधिमंडळामध्ये आमदार म्हणून राजीव सातव याची कामगिरी कौतुकास्पद अशी होती. सतत नावीन्यपूर्ण शिकण्याचा त्यांना ध्यास होता. जनतेचे प्रश्न ते विधानसभेत पोटतिडकीने मांडत. त्यानंतर खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक वेळा अभ्यासू भाषणे केली.त्यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. देशातील राजकारणाची अतिशय चांगली जाण असणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
    खा. राजीव सातव यांचा स्वभाव संयमी, मितभाषी असा होता. ते पुण्यात उपचार घेत असताना आजारातून निश्चितपणे बरे होतील असा विश्वास वाटत होता. पुत्र राजीवच्या अचानकपणे सोडून जाण्याने मातोश्री माजी मंत्री रजनी सातव यांना बसलेला हा प्रचंड धक्का सहन करण्याची ताकद ईश्वराने त्यांना द्यावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी केली

  • 16 May 2021 12:41 PM (IST)

    खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला: छगन भुजबळ

    मुंबई:काँग्रेसचे युवा नेते राज्यसभा सदस्य खा.राजीव सातव यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील एक दुवा हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

    मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    तसेच खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सातव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती दवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

  • 16 May 2021 12:25 PM (IST)

    राज्यसभेतील सहकारी राजीवजी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही: उदयनराजे भोसले

    काँग्रेसचे युवा नेते खासदार राजीव सातव यांचे आज दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आमचे राज्यसभेतील सहकारी राजीवजी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावना राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली

  • 16 May 2021 12:24 PM (IST)

    पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेला एका सच्चा कार्यकर्त्यांला आपण मूकलो: यशोमती ठाकूर

    कॉग्रेस पक्षाचे राज्यसभेचे युवा खासदार  महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.मागील 23 दिवसांपासून राजीव सातव यांच्या वर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या या निधनावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंत्यत भावनिक अशी प्रतिक्रिया दिली,मी आणि राजीव आह्मी एका कॉलेज मध्ये होतो याचा कॉलेज जीवनाचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला, सातव यांचं जाणं धक्कादायक आहे.पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेला एका सच्चा कार्यकर्त्यांला आपण मूकलो.माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान असल्याचं मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या…

  • 16 May 2021 12:04 PM (IST)

    राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले : उद्धव ठाकरे

    मुंबई:राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • 16 May 2021 11:39 AM (IST)

    राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. ते कोरोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. त्यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

  • 16 May 2021 11:37 AM (IST)

    राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला: नरेंद्र मोदी

    राजीव सातव यांच्या जाण्यानं संसदेतील माझा मित्र गमावला. राजीव सातव हे उभरतं नेतृत्त्व होतं. त्यांच्या कुटुंबीय, मित्र, समर्थक यांच्यांप्रती संवदेना व्यक्त करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

  • 16 May 2021 11:32 AM (IST)

    राजकारणातील देव माणूस म्हणता येईल असा नेता आम्ही गमावला : विजय वडेट्टीवार

    राजीव सातव यांच्या निधनाने मोठा धक्का काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस जणांना बसला आहे. राजकारणातील देव माणूस म्हणता येईल असा नेता आम्ही गमावला , त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, आज दुःखद घटना समोर आली ,दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडणे हे त्यांचं कौशल्य होते. गुजरात राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळाली होती  भावूक होत मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  सातव यांच्या काही गोष्टींना उजाळा सुद्धा दिला.
  • 16 May 2021 11:30 AM (IST)

    राजीव सातव यांच्या जाण्याने फक्त कॉंग्रेसचेच नाही तर लोकशाहीचे नुकसान: बाळासाहेब थोरात

    राजीव सातव यांच्या जाण्याने फक्त कॉंग्रेसचेच नाही तर लोकशाहीचे नुकसान आहे. मी राजीव सातव यांना अंत्यत जवळून बघितले आहे, ते संघर्ष करत खासदार झाले होते. 2014 च्या प्रतिकूल परिस्थितीत ते निवडून आले, त्यांना लोकांच्या प्रश्नांची जाण होती. मी दिल्लीला गेलो की नेहमीच त्यांना भेटायचो, त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना दिल्लीत भेटलो होतो. वयाच्या ४५व्या वर्षी सातव हे संसदरत्न झाले होते, आज खूप मोठे नुकसान झाले,असं काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 16 May 2021 11:28 AM (IST)

    राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला: उद्धव ठाकरे

    खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेला. आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.

  • 16 May 2021 11:26 AM (IST)

    राजीव सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक आश्वासक तरुण नेत्रूत्व आपण गमावले: एकनाथ खडसे

    राजीव सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक आश्वासक तरुण नेत्रूत्व आपण गमावले: एकनाथ खडसे

  • 16 May 2021 11:21 AM (IST)

    राजीव सातव उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते: सुप्रिया सुळे

    काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • 16 May 2021 11:17 AM (IST)

    एक नव्या दमाचे अभ्यासु नेतृत्व आज देशाने गमावले: बच्चू कडू

    एक नव्या दमाचे अभ्यासु नेतृत्व आज देशाने गमावले.राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भावना व्यक्त केल्या.

  • 16 May 2021 11:14 AM (IST)

    राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसचा महाराष्ट्राचा आवाज हरपला: सतेज पाटील

    राजीव सातव यांच्या जाण्याने काँग्रेसचा महाराष्ट्राचा आवाज हरपला. त्यांनी नेहमीच आमचे मार्गदर्शक म्हणून काम केलं. आम्हाला अजूनही त्यांच्या कडून अपेक्षा होत्या. सातव यांच्या जाण्याने पक्षा सोबतच माझं ही वैयक्तिक नुकसान झालं, अशा भावना काँग्रेस नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

  • 16 May 2021 11:12 AM (IST)

    राजीव सातव यांचे पार्थिव हिंगोलीकडे रवाना, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

    काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी निधन झालं.  राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे रवाना झालं, यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. महाराष्ट्राचा नेता गेला, अशी शब्दात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

  • 16 May 2021 11:09 AM (IST)

    राजीव सातव यांना राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती: चंद्रकांत पाटील

    महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे, अशा शब्दांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीव सातव यांना आदरांजली वाहिली.

  • 16 May 2021 11:07 AM (IST)

    राजीव सातव यांच्या निधनामुळं काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांना अश्रू अनावर

    राजीव सातव यांच्या निधनामुळं काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांना अश्रू अनावर झाले.

  • 16 May 2021 11:06 AM (IST)

    राजीवभाऊ जाण्यानं हजारो युवकांचं प्रेरणास्थान,मार्गदर्शक हरपला: सत्यजीत तांबे

    राजीवभाऊ, आपण कायम संघर्ष करुन विजय मिळवला, ह्या आजाराच्या संकटावरही आपण मात करुन शेवटच्या क्षणी तरी बाहेर याल हीच माझ्यासह अनेकांची अपेक्षा होती. दुर्देवाने आम्ही सगळेच हारलो. हजारो युवकांचे प्रेरणास्थान,मार्गदर्शक हरपला. नियती क्रुर आहे. नियतीच्या ह्या चुकीसाठी कधीच माफी नाही, अशा भावना युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केल्या.

  • 16 May 2021 11:02 AM (IST)

    राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले : अजित पवार

    मुंबई :काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

  • 16 May 2021 11:01 AM (IST)

    राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला: देवेंद्र फडणवीस

    काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.

  • 16 May 2021 10:59 AM (IST)

    काँग्रेसचे नेते राजीव सातव जी यांचे निधन धक्कादायक : आदित्य ठाकरे

    काँग्रेसचे नेते राजीव सातव जी यांचे निधन धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना बळ मिळो ही प्रार्थना, अशी भावना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

  • 16 May 2021 10:57 AM (IST)

    राजीव सातव हे मला भावासारखे होते: विश्वजित कदम

    गेल्या दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बॅक्टेरिया आणि लंग इन्फेक्शनमुळं तब्येत बिघडली. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत होतो. राजीव सातव यांचं 4 वाजून 58 मिनिटांनी निधन झालं. राजीव सातव यांनी कमी वयामध्ये अखिल भारतीय युथ काँग्रेसचं नेतृत्व केलं. लोकांशी मनमोकळे पणानं राजीव सातव वागत होते. राजीव सातव हे भावासारखे होते. राजीव सातव यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही उभे आहोत, असं काँग्रेस नेते राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी म्हटलं. थोड्याच वेळात राजीव सातव यांचं पार्थिव हिंगोलीकडे नेण्यात येणार आहे, अशी माहिती देखील कदम यांनी दिली.

  • 16 May 2021 10:48 AM (IST)

    राजीव सातव यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता कळमनुरी येथे अंत्यसंस्कार होणार

    काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 10 वाजता कळमनुरी  येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 16 May 2021 10:47 AM (IST)

    राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद: नितीन गडकरी

    युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे,अशा भावना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • 16 May 2021 10:45 AM (IST)

    काँग्रेस पक्षातील माझे सहकारी व खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक: नितीन राऊत

  • 16 May 2021 10:44 AM (IST)

    भविष्यातील दिल्लीतील महाराष्ट्राचा नेता म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहायचो: संजय राऊत

    राजीव सातव यांच्या पत्नीच्या फोनवर व्हिडीओ कॉल केला. त्यांना बोलता येत नव्हतं पण त्यांनी हात केला. दिल्लीतल्या कार्यक्रमात त्यांनी बराच वेळ गप्पा मारत होते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजीव सातव यांच्या जाण्यानं देशाच्या राजकारणातील महाराष्ट्राचा एक स्तंभ कोसळला आहे. भविष्यात दिल्लीत महाराष्ट्राचा नेता म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहत होतो. माझ्यापेक्षा लहान होते, रोज बोलत होतो. राहुल गांधीच्या मनात काय आहे, हे समजून घ्यायचं असेल तर राजीव सातव यांच्याशी गप्पा मारत होतो, अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.