मुंबई: मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती मिळाल्यामुळे एरवी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी आता आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवला आहे. तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. (Congress should clear their stand on Maratha Reservation says Vinayak Mete)
विनायक मेटे यांनी यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. मराठा समाज नितीन राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या कामावर नाखुश आहे. सोनिया गांधी यांनी दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहतात. तसा पुढाकार मराठा समाजासाठी का घेतला जात नाही, असा सवाल विनायक मेटे यांनी या पत्रात उपस्थित केला आहे.
सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे सध्या मराठा आंदोलक महाविकासआघाडी सरकारवर नाराज आहेत.
आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून कशाप्रकारे युक्तिवाद केला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळाची मराठी आरक्षण उपसमिती सातत्याने वकिलांशी संपर्कात आहे. आगामी सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याला राज्य सरकारचे प्राधान्य असेल.
संबंधित बातम्या:
अनेक वर्षे सत्ता, तरी मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
“राज्याने मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं नाही, सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग”
मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, समाजाचं नुकसान होऊ नये हीच प्रमाणिक भावना : अशोक चव्हाण
फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा
(Congress should clear their stand on Maratha Reservation says Vinayak Mete)