महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीये. वाचा राज्यातील सर्व जिल्ह्याचे कारोना अपडेट एका क्लिकवर…
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 186 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत 1771 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
सांगलीमध्ये सध्या 667 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार
दिवसभरात 17 रुग्ण कोरोनातून मुक्त
सांगलीमध्ये आतापर्यंत 49417 जणांना कोरोनाची लागण
मालेगाव : मालेगावमध्ये कोरोना उद्रेक सुरूच
मालेगावमध्ये दिवसभरात आढळले 182 नवे कोरोना रुग्ण
गेल्या पाच दिवसांत सापडले 785 नवे रुग्ण
मालेगाव मनपा क्षेत्रात सक्रिय रुग्णांची संख्या 878 वर
मागेलवात एकूण कोरोना रुग्ण – 6825
मालेगावमध्ये आतापर्यंत 5763 जणांना डिस्चार्ज
मालेगावमध्ये आतापर्यंत 184 जणांचा मृत्यू
जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 921 नवे रुग्ण आढळले असून आज दिवसभरात 504 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. यथे आज दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला. जळगावात कोरोनामुळे आतापर्यंत 1474 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीये
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.
राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक नियमांचे कोटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगबाद अशा मोठ्या शहरांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. खबरदारी म्हणून नागपूरसाऱख्या शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे असूनसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.
पुणे : पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2834 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला.
पुण्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 229383 वर पोहोचला आहे. आज आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला असून हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढत आहे.
सांगलीमध्ये आज दिवसभरात 186 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात 59 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
नांदेड : जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे 697 नवे कोरोना रुग्ण
नांदेडमध्ये सध्या 4170 सक्रिय रुग्णांवर उपचार
24 तासात 5 कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू
नांदेडमध्ये आतापर्यंत 632 रुग्णांचा मृत्यू
सध्या 51 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
नागपुरात आज 3235 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नागपुरात दिवसभरात 35 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
दिवसभरात 1245 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 185787
बरं होणाऱ्यांची संख्या – 155655 वर
नागपुरात आतपर्यंत 4563 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 2957 जणांची तपासणी,
यातील 128 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट
चंद्रपूरमध्ये एकूण कोरोना रुग्ण : 25392
एकूण कोरोनामुक्त : 23910
चंद्रपुरातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा : 1075
चंद्रपुरात आतापर्यंत 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शनिवार रविवार दोन दिवस बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशं
– अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशं
– कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याचा प्रशासनाने घेतलाय निर्णय.
– नागरिकांनी पुढील दोन दिवसीय अंशतः लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन
नाशिक : येवल्यात आणखी 42 नवे कोरोनाबाधित आढळले.
येवल्यात आतापर्यंत54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पोहचली 1539 वर
येवला तालुक्यात आतापर्यंत1285 जणांची कोरोनावर मात
सध्या 200 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतली आहे.
– मुंबईला जात असताना ओझर विमान तळावर ही बैठक झाली
– बैठकीला जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते
यावेळी नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना आटोक्यात आणण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती
– नियमांबाबत जनजागृती करा, नागरिकांना कोरोनाच्या धोक्याचं महत्व पटवून द्या, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश
– मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणार, निर्बंध जैसे थे असतील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती
जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रूग्ण वाढत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरातील आरोग्य यंत्रणेने घेतलेल अथक परिश्रम आणि जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्यूदर प्रथमच 2 % च्या खाली आला आहे. काल कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 1.99 % वर पोहोचला होता. आज हा मृत्यूदर 1.97 % वर पोहोचला आहे.
-पुणे शहरात दररोज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 70 ते 75 रुग्ण नॉट रिचेबल
– पालिकेला पॉझिटिव्ह रूग्णांचा शोध घेणं बनलं अवघड,
– नॉट रिचेबल रुग्णांचा आता पोलीस घेणार शोध,
– रुग्णांची माहिती पालिका देणार पोलीस आयुक्तांना
– नॉट रिचेबल रुग्णांमुळे धोका वाढला,
– रुग्ण शोधून काढण्याचं पालिकेसमोर मोठं आव्हान ,
– आता नॉट रिचेबल रुग्णांवर होणार शोध घेऊन कारवाई.
साताऱ्याच्या सैनिक स्कुलमध्ये कोरोनाचा शिरकाव
शाळेतील 4 विद्यार्थ्याना कोरोनाची लागण
सुट्टीसाठी घरी जाउन आलेल्या विद्यार्थ्याकडुन कोरोनाची लागण
शाळेतील इतर विद्यार्थ्याची होणार कोरोना चाचणी
धुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर, गेल्या 26 दिवसात 4 हजार 692 रुग्ण
14 फेब्रुवारीला होते फक्त 6 रुग्ण…
19 फेब्रुवारी पासून रुग्णच्या संख्येत वाढ..
15 मार्चला सर्वाधिक रुग्णांची नोंद, 515 रुग्णांची झाली होती नोंद
उस्मानाबाद जिल्ह्यात काल सर्वाधिक 164 कोरोना रुग्ण, स्तिथी दिवसेंदिवस गंभीर
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर तसंच कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन