मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध रुग्णालयात कोरोना प्रतिबंधित लसीची चाचणी केली जात आहे. नुकतंच कोरोना विषाणूवरील कोव्हिशिल्ड लसीच्या केईएम रुग्णालयातील दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात एकूण 95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यानंतर आता 21 मार्चपर्यंत या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले जाणार आहे. (Corona Covishield Vaccine Second phase completed at KEM Hospital)
कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केईएम रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा टप्प्यासाठी 101 जणांना डोस देण्यात आला होता. मात्र दुसऱ्या फेरीत 6 स्वयंसेवक सहभागी झाले नाही. त्यामुळे फक्त 95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्या फेरीतील डोस पूर्ण झाले आहेत.
आता येत्या 21 मार्चपर्यंत या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले जाणार आहे. जर या स्वंयसेवकावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले तर त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जाईल.
दरम्यान, नायर रुग्णालयात आता फक्त 16 स्वयंसेवकांना लसीचा डोस देणे बाकी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात नायरमध्येही या लसीचा टप्पा पूर्ण होईल. नायरमध्ये पहिला डोस 145 जणांना दिला गेला. आतापर्यंत दुसरा डोस 129 जणांना दिला आहे. तर 16 जणांना देणे बाकी आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 145 स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जाण्याची शक्यता आहे. (Corona Covishield Vaccine Second phase completed at KEM Hospital)
संबंधित बातम्या :
बापरे! मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण