मुंबई : व्हिसा संदर्भातील मुंबई (Corona Effect Visa Procedure) पोलिसांची सेवा आजपासून पुढच्या एक महिन्यासाठी बंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर(Corona Effect Visa Procedure) ही सेवा खंडित करण्यात आली आहे.
जी व्यक्ती व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करत असतात, त्यांना तसेच ज्यांना व्हिसा मिळाला आहे किंवा व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे, त्यांना मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी विभाग अर्थात एसबी 2 येथे माहिती द्यायची असते. तशी नोंद करायची असते. या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी येणारे हे मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक असतात.
हेही वाचा : Corona Death India | देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू
सध्या कोरोना विषाणू जलदगतीने पसरत आहे. परदेशी (Corona Effect Visa Procedure)नागरिकांचा सतत या विभागात राबता असल्याने आता ही सेवा एक महिन्यासाठी खंडित करण्यात आली आहे. 15 एप्रिल पर्यंत ही सेवा बंद असणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करण्याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
कोरोनाचा हाहा:कार, देशात चौथा बळी
देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.
The total number of positive cases of #COVID19 in India stands at 167 (including 25 foreigners), 4 deaths (1 each) in Delhi, Karnataka, Punjab and Maharashtra: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/sk4rfzvlUE
— ANI (@ANI) March 19, 2020
देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
Corona Effect Visa Procedure
संबंधित बातम्या :
‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचे मॅशअॅप, रोहित पवारांकडून व्हिडीओ शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी