मुंबई : मुंबई शहर, उपनगरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण सुरळीत असून कोरोना रुग्णनिदानाचा दर घसरत (Corona Patient Diagnosis Rate Dropped) चालला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पहिल्यांदाच मुंबईचा रुग्ण पॉझिटिव्हीटीचा दर 10 टक्क्यांच्या खाली आला आहे (Corona Patient Diagnosis Rate Dropped).
जून महिन्यापर्यंत दर दिवसाला 100 चाचण्यांचे प्रमाण होते, त्या वेळेस पॉझिटिव्ह दर 20 टक्के दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याच्या परिमाणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पॉझिटिव्ह दर 5 टक्क्यांच्या खाली, तर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने पॉझिटिव्ह दर 10 टक्क्यांच्या खाली असावा असे नमूद केले आहे.
गेल्या 10 दिवसांत 1 लाख 31 हजार 301 चाचण्यांनंतर 13 हजार 539 रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण 1 लाख 95 हजार 668 चाचण्यांमागे 31 हजार 53 इतके होते.
मुंबईत ऑक्टोबर महिन्यात दिवसाला 13-15 हजार चाचण्या केल्या जात आहेत. 1 लाख 31 हजार चाचण्यांमध्ये 58 हजार 600 अँटीजन चाचण्यांचा समावेश होता. त्या चाचण्यांच्या माध्यमातून रुग्ण निदानाचे प्रमाण केवळ 5 टक्के आहे.
ऑक्टोबरच्या पंधरवड्यात अँटीजन चाचण्यांचे प्रमाण हे 40 टक्के राहिले आहे. तर दुसरीकडे, आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी झाले असून, मागील दहा दिवसांत हे प्रमाण 20 टक्क्यांच्या खाली गेले आहे.
71 वर्षीय आजीबाईंची तब्बल 50 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनावर मात, ‘घाटी’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यशhttps://t.co/EuyDAU1TUM@rajeshtope11 @OfficeofUT @CMOMaharashtra #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2020
Corona Patient Diagnosis Rate Dropped
संबंधित बातम्या :
तिळ्यांचा आईसोबत कोरोनाशी लढा, तिघांचाही रिपोर्ट नेगेटिव्ह
सावधान! जर्मनीपाठोपाठ फ्रान्स, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, दिल्लीतही कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ
नागपूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या लाखाच्या उंबरठ्यावर, मात्र 1300 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखलं