‘केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना

| Updated on: May 31, 2020 | 1:42 PM

केईएम रुग्णालयातून एक 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता झाला (Corona Patient missing KEM Hospital) आहे.

केईएममधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना
Follow us on

मुंबई : केईएम रुग्णालयातून एक 70 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता झाला (Corona Patient missing KEM Hospital) आहे. रुग्ण बेपत्ता झाल्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. 10 दिवस उलटूनही रुग्ण सापडत नाही. पोलीस या रुग्णाचा शोध घेत आहेत (Corona Patient missing KEM Hospital).

या कोरोनाबाधित रुग्णाला 14 मे रोजी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 मे रोजी केईएम रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाच्या जावयाला फोन आला. यावेळी रुग्णालयातून सांगण्यात आले की, तुमच्या रुग्णाची तब्येत गंभीर आहे. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे.

19 मे रोजी कोरोनाबाधित रुग्णाच्या जावयाने रुग्णालयात कॉलकरुन रुग्णाबद्दल विचारले असता, तुमचा रग्ण सापडत नाही, असं उत्तर देण्यात आले.

रुग्ण गायब झाल्यानंतर पोलीस या रुग्णाचा शोध घेत आहेत. दहा दिवस उलटूनही अद्याप या रुग्णाचा शोध लागला नाही. याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे तक्रार केली आहे. आता सोमय्या हे रुग्णालय, महापालिका आणि पोलीस यांच्यासोबत बोलून पाठपुरावा करत आहेत.

संबंधित बातम्या :

आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांची बदली, जेलमध्ये 200 पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु