महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?

| Updated on: Jun 13, 2020 | 5:56 PM

राज्यात प्लाझ्मा थेरपी ही 18 मेडिकल हॉस्पिटल आणि 4 महापालिका हॉस्पिटलमध्ये करत आहोत, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. (Rajesh Tope On Corona Test Price)

महाराष्ट्रात खासगी लॅबमधील कोरोना चाचणीच्या दरात 50 टक्के कपात, नवी किंमत किती?
Follow us on

मुंबई : राज्यात खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, यापुढे राज्यातील खासगी लॅबमध्ये कोरोनाच्या चाचणीसाठी 2 हजार 200 रुपये आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन टेस्ट करण्यासाठी आता 2 हजार 800 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Rajesh Tope On Corona Test Price)

राज्यात कोरोना चाचण्यांसंदर्भात राज्य सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. या अहवालानुसार यापुढे खासगी लॅबमध्ये महाराष्ट्रात प्रति व्यक्ती कोरोना चाचणीसाठी 2 हजार 200 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच एखाद्या रुग्णाची घरी जाऊन जर टेस्ट करायची असेल तर पूर्वी 5 हजार 200 रुपये आकारले जात होते. मात्र आता त्यासाठी फक्त 2 हजार 800 रुपये आकारण्यात येणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रातील खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी 50 टक्के रक्कम कमी केली आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने खासगी लॅबमध्ये कोरोनासाठी एवढे पैसे कमी केले आहेत. आतापर्यंत 100 लॅब कार्यरत आहेत. विशेष म्हणजे फक्त कोव्हिडसाठी नव्हे तर इतर आजारांच्या टेस्टसाठी ही लॅब वापरता येणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईत बेड्स कमी आहे, हे आम्हीही मान्य करत आहोत. दररोज 15 ते 20 बेड शिल्लक होतात. सर्व रुग्णालयात आम्ही बेडची संख्या वाढवत आहोत. मुंबईत 500 आयसीयू बेड लवकरच वाढण्यात येतील. राज्यात प्लाझ्मा थेरपी ही 18 मेडिकल हॉस्पिटल आणि 4 महापालिका हॉस्पिटलमध्ये करत आहोत, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते. मात्र आम्ही एक मीटर अंतर ठेवून बसलो होतो. खबरदारी म्हणून मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार स्वत: सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. तसेच प्रत्येकजण स्वत: ची काळजी घेत आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले. (Rajesh Tope On Corona Test Price)

संबंधित बातम्या : 

माझ्यासाठी दुआ करा, पाकिस्तानचा धडाकेबाज क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला कोरोना

Pandharpur Corona | जपानवरुन पंढरपुरात आलेला चिमुकला कोरोना पॉझिटिव्ह