मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण राज्य सरकार आणि आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरलाय. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. त्यामुळे राज्य सरकारसह विविध महापालिकांनीही तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी कोविड सेंटर अॅक्शन प्लॅन तयार केलाय. (BMC action plan prepared to face the third wave of corona)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेनं उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईला येत्या काही दिवसांत 6 ते 7 हजार वाढीव बेड मिळणार आहेतस अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून मालाड, सोमय्या ग्राऊंड आणि कांजुरमार्ग इथं प्रत्येकी 2 हजार बेडचं नवं जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक जम्बो कोविड सेंटरमध्ये किमान 100 खाटांचा पेडियाट्रिक वॉर्ड असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग रुग्णांसाठीही विशेष वॉर्ड उभारण्यात येणार अशल्याची माहिती काकाणी यांनी दिलीय.
मुंबईत उद्यापासून गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचं लसीकरण केलं जाणार आहे. वॉकिंग सुविधेनुसार या महिलांना लस घेता येणार आहे. पण गर्भवती महिला किंवा स्तनदा मातांनी लसीकरणापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं काकाणी यांनी म्हटलंय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशा महिलांना लसीकरणासाठी येताना सर्टिफिकेट आणावं, असंही काकाणी यांनी सांगितलं आहे.
मुंबई शहरचे पालकमंत्री @AslamShaikh_MLA आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री @AUThackeray यांनी मुंबई शहरातील विविध विषयांचा घेतला आढावा. त्यात #Tauktecyclone मुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, लसीकरण आणि पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा समावेश. pic.twitter.com/kZoNaFouHG
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 24, 2021
कोरोना लसींच्या उपलब्धतेसाठी मुंबई महापालिकेनं ग्लोबल टेंडर काढलं आहे. या ग्लोबल टेंडरचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्याबाबत उद्या चित्र स्पष्ट होईल. आतापर्यंत 3 पुरवठादार समोर आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुंबईत म्युकरमायकोसिसचे 150 रुग्ण आहेत. या रुग्णांना लागणारी औषधं मिळावीत यासाठी एक टीम बनवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मुंबईतील लॉकडाऊन उठवण्याबाबत विचार करत असताना मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातील रुग्ण संख्येबाबत विचार करावा लागेल असंही काकाणी यांनी म्हटलंय.
राज्यातील 130 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार, राज्य सरकारकडून स्पष्ट https://t.co/boTl80ig1W @CMOMaharashtra @OfficeofUT @rajeshtope11 #Mucormycosis #BlackFungus #CoronavirusIndia #Aurangabad #HighCourt #MaharashtraGovernment
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
संबंधित बातम्या :
भारतात कोणत्या राज्यात कोरोना लाट कधी येणार? आयआयटी संशोधकांच्या अहवालात मोठे खुलासे
आता घरच्या घरी कोरोना चाचणी करणं शक्य, होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, ICMRचा महत्त्वाचा निर्णय
BMC action plan prepared to face the third wave of corona