मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न होत आहेत. पण कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरुच आहे. त्यात आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी तब्बल 60 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. तर राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दर 16 टक्क्यांपेक्षा जास्त असून, ही चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं सरकारनं घालून दिलेले नियम पाळण्याचं आणि काळजी घेणं गरजेचं बनलं आहे.(Compared to corona patients in the country, 60 per cent patients in Maharashtra alone)
एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रात 60% रुग्णसंख्या
राज्यातील पॉझिटीव्ही दर 16% पेक्षा अधिक, ही चिंतेची बाब.
महाराष्ट्राने चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता, RTPCR चाचण्यांना प्राधान्य द्यावे.
सचिव, @MoHFW_INDIA pic.twitter.com/kPDTVXlHql
— PIB in Goa (@PIB_Panaji) March 17, 2021
नांदेड
नंदूरबार
बीड
धुळे
नाशिक
जळगाव
भंडारा
नागपूर
चंद्रपूर
अहमदनगर
बुलडाणा
औरंगाबाद
अकोला
या जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर दिवसभरात 23 हजार 179 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 138 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दिवसभरात महाराष्ट्रात 84 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आढावा घेतला तर राज्यात आतापर्यंत 23 लाख 70 हजार 507 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 21 लाख 63 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 53 हजार 80 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
23,179 new cases have been reported in the state today
The state tally of #Covid_19 positive patients is now 23,70,507
District-wise details of cases and deaths until today are as follows:
(3/4)? pic.twitter.com/kFitpJfuBJ
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) March 17, 2021
पुण्यात कोरोग्रस्तांचा आलेख दररोज वाढतच आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 2587 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यातील 573 रुग्णांचे अहवाल मागील काही दिवसांपूसन प्रलंबित होते. नवे कोरोनाग्रस्त आढळण्याचे प्रमाण आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण याकडे पाहिले, तर पुण्यात कोरोना महामारीची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं. पुण्यात दररोज अडीच हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 1 हजारांपेक्षांही कमी आहे. आज पुण्यात दिवसभरात 2587 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात फक्त 769 जण कोरोनातून मुक्त झाले.
संबंधित बातम्या :
शॉपिंग मॉल, सिनेमागृहात मास्क बंधनकारक; अंत्यविधीपासून लग्नापर्यंत जालन्यातील नवे निर्बंध काय?
Nagpur Lockdown Update : नागपुरात कडक निर्बंध, भाजी-फळं-चिकन मटण दुकानाच्या वेळा बदलल्या!
Aurangabad Lockdown : औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शहरातील हॉटेल्स बुधवारपासून बंद!
Compared to corona patients in the country, 60 per cent patients in Maharashtra alone