नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. देशातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण 89.51 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 9.24 टक्के नवे रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचं प्रमाण 1.25 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा या लाटेत जास्त रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे चिंता वाढल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. यावेळी भूषण यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबाबत पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय. (Decline in the number of RTPCR tests in Maharashtra)
यापूर्वी राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना एक पत्र पाठवलं होतं. त्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यास राज्य सरकार कमी पडलं. तसंच प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आढळ्याचंही भूषण यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत भूषण यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात RT-PCR चाचण्यांमध्ये कमतरता असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला 57 हजारांवर पोहोचलाय. ही रुग्णसंख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांचं प्रमाण हळूहळू वाढत असलं तरी ते पुरेसं नसल्याचंही भूषण यांनी म्हटलंय. आज सकाळी 8 वाजेपर्यंत देशात 10.85 कोटीपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 40 लाखापेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती भूषण यांनी दिलीय.
Through @ICMRDELHI, we have offered to the states, that they could make use of mobile testing labs. There are multiple private players offering such mobile tests at cost-effective rates. RTPCR machines have also been put on the Govt. e-Marketplace (GeM): Secretary, @MoHFW_INDIA
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 13, 2021
महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या संवादामध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. त्यापूर्वी 8 मार्चला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संवाद साधला होता. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता, काय सुरु आणि काय बंद राहणार?
ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत
Decline in the number of RTPCR tests in Maharashtra