मुंबई: राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थितीमध्ये लॉकडाऊननंतर (Maharashtra Lockdown) कमालीचा फरक पडलेला दिसत आहे. कारण, आता मुंबईत कोरोना (Mumbai Coronavirus) रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत (डबलिंग रेट) वाढ झाली आहे. या पंधरवड्यात मुंबईचा कोरोना डबलिंग रेट 15 दिवसांनी वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील डबलिंग रेट 55 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. ही परिस्थिती अशीच सुधारत राहिल्यास आरोग्य यंत्रणांवरील भार कमी होईल. (Coronavirus doubling rate increases in Mumbai)
याशिवाय, गेल्या काही दिवसांत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने खाली येताना दिसत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दिवसाला 10 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या 15 दिवसांत यामध्ये टप्प्याटप्प्याने घट होत हा आकडा आता 5 हजारापर्यंत येऊन स्थिरावला आहे. हे मुंबईतील परिस्थिती सुधारत असल्याचे द्योतक आहे.
रविवारी दिवसभरात मुंबईत 5542 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णंख्येमधील सर्वांत कमी आहे. मुंबईत याआधी 31 मार्च या दिवशी 5394 नवे रुग्ण आढळले होते.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांपूसन मृतांच्या संख्येतसुद्धा सातत्याने वाढ झाल्याचे नोंदवले गेले. आज मुंबईत एकूण 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच यापैकी 36 जण याआधीच कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होते. ही माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. आजच्या एकूण मृतांमध्ये 28 महिलांचा समावेश असल्याचेसुद्धा मनपाने सांगितले. आजची आकडेवारी मिळून मुंबईमध्ये मृतांचा आकडा 12783 वर पोहोचला आहे.
इतर बातम्या :
मुंबईला दीड लाख कोरोना लसींचा साठा मिळाला, पुढील 3 दिवस लसीकरणाचा मार्ग मोकळा
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते
(Coronavirus doubling rate increases in Mumbai)