मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांसह कोरोनाबळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली (Mumbai HC Corona Dead Bodies buried) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोविडबाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करु नये याबाबत अनेक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर कोर्टाने मृतदेह दफन करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला तर व्यक्तीचा मृत्यूदेह दफन करू नये याबाबत (Mumbai HC Corona Dead Bodies buried) मुंबई हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या आहेत. यावर निकाल देताना कोर्टाने कोविड 19 बाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे. एवढंच नव्हे तर याबाबत मुंबई महानगरपालिकेने नव्याने आदेश काढावेत. तसेच मृतदेह दफन करताना नातेवाईकांची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे ही हायकोर्टाने या आदेशात म्हटलं आहे.
काही धर्मांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दफन करण्याची पद्धत आहे. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मृतदेहामार्फत कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून मुंबई महानगरपालिकेने मृतदेहाचे दफन करु नये असे परिपत्रक 30 मार्चला काढले होते.
पण त्यानंतर त्याच दिवशी ज्या दफनभूमीत मोठी जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेह दफन करु शकता, अशा आशयाचा दुसरा सुधारित आदेश पालिकेने काढला. या दोन्ही आदेशाविरोधात कोर्टात कोर्टात याचिका करण्यात आली होती.
यात दुसऱ्या सुधारित आदेशाविरोधात वांद्रे परिसरातील राहणारे प्रदीप गांधी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. त्यात त्यांनी वांद्रे येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये दफन विधी करू नये अशी मागणी केली होती.
तर पालिकेच्या पहिल्या आदेशाचा विरोधात अॅड. अल्ताफ खान यांनी याचिका दाखल केली होती. त्यात पालिकेने कोणत्याही वैज्ञानिक कारणाशिवाय दफन विधी करू असे काढलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी केली होती. या दोन्ही याचिकेवर निकाल देताना कोर्टाने कोविडबाधित व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे. तसेच मुस्लिम कब्रस्तान विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळून लावली (Mumbai HC Corona Dead Bodies buried) आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला