मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळं त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गृहराज्यमंत्री (Minister of State for Home Affairs) संभुराज देसाई पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाले, औरंगाबादच्या राज ठाकरे यांच्या सभेला काही अटी, शर्ती लावण्यात आल्या होत्या. त्यानंतरच सभेला परवानगी दिली होती. पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) या सभेचे अवलोकन केलं. त्यानंतर आता खात्री झाली आहे की, या अटी, शर्तींचं उल्लंघन करण्यात आलंय. त्यामुळं आयुक्त त्यांच्याकडं असलेल्या अधिकारात नियमानुसार कारवाई करतील. त्यामुळंच आयुक्तांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली असेल. त्यामध्ये ज्या कलमाखाली गुन्हा दाखल होईल. त्याच्यामध्ये जी काही तरतुदी आहेत. त्याचं पालन झालं पाहिजे, असंही संभुराज देसाई (Sambhuraj Desai) यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांच्या विरोधात 153 a ही कलम लावण्यात आली आहे. राज ठाकरे हे अटकपूर्व जामीन घेऊ शकतात. त्यांना जामीन घेण्याचा हक्क आहे. त्यामुळं अटकपूर्व जामिनासाठी ते अर्ज करू शकतात. काही अटी आणि शर्टींवर त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकतो. पण, जामीन मिळाला नाही तर त्यांच्यावर अटकेची तलवार आहे. अटक झाल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकले.
दंगे भडकविण्याच्या हेतूनं चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणीही गुन्हा राज ठाकरे यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. पण, राज ठाकरे यांचे वकील हे त्यांच्याविरोधात असलेल्या एफआयआरलाही आव्हान देऊ शकतात. औरंगाबाद उच्च न्यायालयात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते. जे गुन्हे पोलिसांनी लावले ते अत्यंत विचार करून लावल्याचं दिसतं, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणय. एक-एक अट आणि त्याचं उल्लंघन कसं केलं. घटनाक्रम पोलिसांनी दिलेला आहे, असं कळतंय. त्यामुळं अत्यंत विचार करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राज ठाकरेंच्या सभेचं अवलोकन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी हे गुन्हे दाखल केले आहेत, असं राज्याचे गृहराज्यमंत्री संभुराज देसाई यांनी सांगितलं.