मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी, मालेगाव, संभाजीनगर आणि आता नागपूरमध्ये मोठ्या गर्दीत सभा झाल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगतात. तर त्याविरोधात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या सभेत भाडोत्री गर्दी जमा केल्याची टीका केली जाते. आजही महाविकास आघाडीची दुसरी सभा नागपूरमध्ये झाली आहे. त्या सभेवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
तर आज महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर भाजपने त्यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्याऐवजी लोकं उठून गेल्याची टीका भाजपने केली आहे.
भाजपकड़ून उद्धव ठाकरे यांच्या सभेच्यावेळी माणसं निघून गेल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तर त्यांच्या भाषणावरूनही उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावरूनच आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवर भाजपने टीका केली आहे.
नागपुरात येऊन उद्धव ठाकरे यांना पवित्र दीक्षाभूमी, संविधान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवले.
पण उद्धवजी तुम्ही निव्वळ भाषणबाजी करता. तोंडाची वाफ दवडता सगळीच ढोंगबाजी!
यंदाच्या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी, 14 एप्रिल रोजी तुम्ही या महामानवाला अभिवादन करायचे विसरलात.— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 16, 2023
महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांचं फडतूस भाषण सुरू असतानाच नागपूरमधील सुज्ञ जनतेनं धरला घरचा रस्ता असं म्हणत त्यांच्या वज्रमूठ सभेची त्यांनी खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता नागपूरच्या सभेवरून पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.