मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्रात वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात ताशी 200 ते 250 किमी वेगाने हे वादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे गुजरातकडे धडकणार आहे. दरम्यान वायू वादळाचा पहिला बळी गेला आहे. चर्चगेट परिसरात होर्डिंग अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माधव आप्पा नार्वेकर (62) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही यामुळे धोका आहे. अशी बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मच्छिमारांनाही दोन दिवस मासेमारी न करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
LIVE UPDATE
[svt-event title=”तीन दिवस मुंबईकरांचे पाणी कपात” date=”12/06/2019,8:17PM” class=”svt-cd-green” ] भातसा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात विसर्ग झडपेतील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई शहरास होणाऱ्या पाणीपुरावठ्यावर परिणाम झाला आहे. सदर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत 12/06/2019 ते 14/06/2019 असे एकून तीन दिवस मुंबई शहरातील पाणी पुरवठ्यात 25 टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आटोकात प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील नागरिकांनी कृपया याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे.. [/svt-event]
[svt-event title=”मांडवी जेटीवर पर्यटकांना जाण्यास बंदी” date=”12/06/2019,6:47PM” class=”svt-cd-green” ]
#रत्नागिरी– वायू चक्रीवादळाचा किनारपट्टी भागाला तडाखा, खवळलेल्या समुद्रातउंचच उंच लाटा, मांडवी धक्का पाण्याखाली, अजस्त्र लाटा किनाऱ्याला, मांडवी जेटीवर पर्यटकांना जाण्यास बंदी https://t.co/1RMwZgsJcc pic.twitter.com/zMkcOHSCWs
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[svt-event title=”मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी, ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप” date=”12/06/2019,5:56PM” class=”svt-cd-green” ]
LIVE – #वायू – मुंबईत ठिकठिकाणी पावसाच्या सरी, ऑफिसवरुन घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/6nG0XZ2s63
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[svt-event title=”गुजरातमधील समुद्रकिनारी राहणाऱ्या 2.15 लाख लोकांचे स्थलांतर” date=”12/06/2019,5:53PM” class=”svt-cd-green” ]
Pankaj Kumar, Addnl Chief Secretary, Gujarat Revenue Department on #CycloneVayu: More than 500 villages in coastal region have been evacuated, 2.15 lakh people have been shifted to shelters. From midnight police will be patrolling the vulnerable areas. pic.twitter.com/yE12l7wam1
— ANI (@ANI) June 12, 2019
[svt-event title=”वायू वादळाचा गुजरातमधील गीर अभयारण्यातील सिंहांना फटका, सिंहांना सुरक्षित ठिकाणी हलवणार” date=”12/06/2019,5:37PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- #वायू वादळाचा गुजरातमधील गीर अभयारण्यातील सिंहांना फटका, सिंहांना सुरक्षित ठिकाणी हलवणार https://t.co/eIKj4Eop7R #Vayucyclone2019 pic.twitter.com/MWLlUD6l70
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[svt-event title=”दक्षिण मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, समुद्र किनारी मोठमोठ्या लाटा ” date=”12/06/2019,5:36PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- दक्षिण मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, समुद्र किनारी मोठमोठ्या लाटा https://t.co/yPHMPE3ggA #वायू pic.twitter.com/6ksXklqnQP
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[svt-event title=”गुजरातमध्ये किनारपट्टी भागातून 1 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर” date=”12/06/2019,4:58PM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये किनारपट्टी भागातून 1 लाखापेक्षा जास्त लोकांचे स्थलांतर, वायू वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा निर्णय, गुजरातच्या 10 ठिकाणाहून 1 लाख 64 हजार 090 लोकांचे संध्याकाळी 4 पर्यंत स्थलांतर [/svt-event]
[svt-event title=”वायू चक्रीवादळ ताशी 170 किमी वेगाने गुजरातमध्ये धडकणार ” date=”12/06/2019,4:42PM” class=”svt-cd-green” ] वायू चक्रीवादळ ताशी 170 किमी वेगाने गुजरातमध्ये धडकणार, ताशी 145 ते 155 किमी वेगाने वायू चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकणार आहे. उद्या 13 जूनला वायू चक्रीवादळाचा जोर आणखी वाढणार असून, ताशी 170 किमी वेगाने वायू चक्रीवादळ गुजरातच्या पोरबंदर किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”वांद्र्यात स्कायवॉकचा पत्रा पडून 3 महिला जखमी” date=”12/06/2019,4:33PM” class=”svt-cd-green” ] वांद्र्यात स्कायवॉकचा पत्रा पडून 3 महिला जखमी, एस व्ही रोड पश्चिमेकडील स्कायवॉकवरील घटना, स्कायवॉकचं मेटल शीट अंगावर पडल्याने तीन महिला जखमी, मलिशा नजरत (30), सुलक्षणा वझे (41), तेजल कदम (27) अशी जखमी मुलींची नावे, जखमींवर होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]
[svt-event title=”वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या 250 किमी अंतरावर” date=”12/06/2019,4:29PM” class=”svt-cd-green” ] वायू चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या 250 किमी अंतरावर, वादळामुळे गुजरातच्या पोरबंदर, भावनगर, गांधीधाम याठिकाणी रेड अलर्ट [/svt-event]
[svt-event title=”गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द” date=”12/06/2019,4:14PM” class=”svt-cd-green” ]
4. IMP Notice : Please note that in view of expected #VayuCyclone in Gujarat covering Veraval, Okha, Porbandar, Bhavnagar and Bhuj/Gandhidham, all Passenger & M/Exp trains to these stations will be short terminated/cancelled after 18:00 hrs of 12/06/19 to morning of 14/06/19. pic.twitter.com/blsKcreWiV
— Western Railway (@WesternRly) June 12, 2019
[svt-event title=”गुजरातमध्ये वायू वादळाचा सर्वाधिक फटका” date=”12/06/2019,4:13PM” class=”svt-cd-green” ] गुजरातमध्ये वेरवाल, ओखा, पोरबंदर, भावनगर आणि गांधीधाम या ठिकाणी अनेक ट्रेन रद्द, आज संध्याकाळी 5 नंतर मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, [/svt-event]
[svt-event title=”गुजरातमध्ये वादळापूर्वीच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात” date=”12/06/2019,4:05PM” class=”svt-cd-green” ] वादळी वाऱ्यामुळे गुजरातचे सोमनाथ मंदीराजवळ धूळीचे वातावरण, धुळीमूळे सोमनाथ मंदीर दिसेनासे [/svt-event]
[svt-event title=”येत्या 24 तासात हे वादळाचा वेग वाढणार” date=”12/06/2019,3:57PM” class=”svt-cd-green” ] येत्या 24 तासात हे वादळाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे [/svt-event]
[svt-event title=”गुजरातमध्ये शाळांना सुट्टी” date=”12/06/2019,3:56PM” class=”svt-cd-green” ] गुजरातच्या वेरावलजवळच्या किनारपट्टीवर हे वादळ धडकू शकतं असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 13 ते 15 जूनपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत समुद्र खवळला, मच्छिमारांना हाय अलर्ट” date=”12/06/2019,3:55PM” class=”svt-cd-green” ] वायू वादळामुळे राज्यात काही ठिकाणी ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहत आहेत. तर अरबी समुद्रात उत्तर पूर्व भागात ताशी 115 किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईत समुद्र खवळला आहे. मच्छिमारांनाही दोन दिवस मासेमारी न करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. [/svt-event]
[svt-event title=”पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत” date=”12/06/2019,3:48PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वादळी वाऱ्यामुळे बोर्डी स्थानकाजवळी पुलाचे गर्डर झुकले. [/svt-event]
[svt-event title=”वायू वादळामुळे बोरिवली, गोराईतील नागरिकांचं स्थलांतर ” date=”12/06/2019,3:42PM” class=”svt-cd-green” ] वायू वादळामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा, मुंबई अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, त्याशिवाय बोरिवली, गोराईच्या किनारपट्टीजवळील नागरिकांचं स्थलांतर [/svt-event]
[svt-event title=”वसई विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत” date=”12/06/2019,3:39PM” class=”svt-cd-green” ] वायू चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबईत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस ” date=”12/06/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत वरळी, लोअर परेल, दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात [/svt-event]
[svt-event title=”बोरिवली परिसरात गाडीवर झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही” date=”12/06/2019,3:35PM” class=”svt-cd-green” ]
LIVE #वायू वादळ #मुंबई – बोरिवलीत झाड कोसळलं, मुंबईत अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात https://t.co/eIKj4Eop7R pic.twitter.com/ts32mzISmL
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2019
[svt-event title=”मुंबईत वायू वादळाचा पहिला बळी” date=”12/06/2019,3:32PM” class=”svt-cd-green” ] चर्चगेट परिसरात होर्डिंग अंगावर पडून एकाचा मृत्यू, माधव आप्पा नार्वेकर (62) असे मृत व्यक्तीचे नाव, उपचारादरम्यान माधव यांचा मृत्यू [/svt-event]