मुंबई : लालबागचा राजा मंडप हा वादाचं केंद्र बनलंय का असा प्रश्न आहे. कारण कधी कार्यकर्त्यांची तर कधी पोलिसांची अरेरावी या परिसरात पाहायला मिळते. आता तर पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी तर एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी केली. स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांना पारा आणखी चढला. (Mumbai police pushes journalists in Lalbaug area)
धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याप्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली.
लालबागच्या कव्हरेजसाठी आम्ही सगळ्यानी नियमानुसार पास काढले होते. पण पास असूनही सकाळपासून पोलिसांनी एन्ट्री दिली नाही. तरीही आम्ही अधिकाऱ्यांशी विनंती करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतो. पण पोलीस निरीक्षक संजय निकम आमच्यावर अरेरावी करायला लागले. त्यांनी धक्के देऊन बाहेर काढायला सुरुवात केली. सकाळपासून आम्ही गेटवर उभे आहोत. त्यांचं बोलणं योग्य नाही. आम्ही फक्त त्यांना एवढंच म्हटलं की, सर आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलतोय तुम्हीही आमच्याशी प्रेमाने बोला, तरीही अशा प्रकारची वागणूक आम्हाला देण्यात अशी अशी प्रतिक्रिया पत्रकार अभिषेक मुठाळ यांनी दिलीय.
इतर बातम्या :
गोव्यात गेलो तरी ‘मी पुन्हा येईन’; व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला
Mumbai police pushes journalists in Lalbaug area