मुंबई : राज्याची राजधानी मुंबईसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबईत वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होतेय. मुंबईत आजही कोरोना रूग्णसंख्येत घट झालीय. आज (26 एप्रिल) एकूण कोरोना रूग्णसंख्या 4 हजारांखाली गेलीय. मागील 24 तासांत मुंबईत 3792 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झालीय. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या 24 तासांत 41 हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्यात (Daily Corona patient decreasing in Mumbai more people are recovering).
Mumbai Corona Updates:
4th: 11163
7th: 10428
9th: 9200
11th: 9000
13th: 7898
15th: 8217
16th: 8839
18th: 8400
19th: 7381
20th: 7214
21st: 7684
22nd: 7410
23rd: 7221
24th: 5888
25th: 5542
26th: 3876Well done Mumbai.#Mumbai #Corona #CoronaUpdates @mybmc @AUThackeray pic.twitter.com/tlHSdOeSTr
— Pravin Sindhu (@PravinSindhu) April 26, 2021
मुंबईत 26 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासात बाधित रुग्णांची संख्या 3876 इतकी आहे. 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9150 इतकी आहे. म्हणजेच बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,46,861 इतकी आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण पाहिलं तर मुंबईत हे प्रमाण 87 टक्के आहे.
#CoronavirusUpdates
२६ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -३८७६
२४ तासात बरे झालेले रुग्ण-९१५०
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,४६,८६१
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८७%एकूण सक्रिय रुग्ण-७०,३७३
दुप्पटीचा दर- ६२ दिवस
कोविड वाढीचा दर (१९ एप्रिल-२५ एप्रिल)- १.०९%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 26, 2021
राजधानी मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण संख्या 70,373 इतकी आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या दुप्पटीचा दर 62 दिवस आहे. कोविड वाढीचा दर 19 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात 1.09 टक्के आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?
मुंबईतील सध्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनुसार नव्या गोष्टी समोर येत आहेत. मुंबईत 25 एप्रिल रोजी एकूण 5542 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आकडेवारी एप्रिल महिन्यात दररोज आढळणाऱ्या रुग्णंख्येमधील सर्वांत कमी आहे. याच कारणामुळे सध्या मुंबईत कोरोनाचा प्रसार मंदावला असून हळूहळू रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे का ?, असे विचारले जाऊ लागले आहे. शनिवारी 24 एप्रिल रोजी 5,888 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
एप्रिल महिन्यात राज्याच्या इतर भागासह मुंबईमध्येसुद्धा दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेलेली आहे. मुंबईत याआधी 31 मार्च या दिवशी 5394 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मुंबईत कोरोनाग्रस्तांमध्ये सातत्याने वाढ होत आली. तसेच रोज रुग्णसंख्या वाढून ही वाढ थेट 8 हजारांच्या पाढ्यात पोहोचली. मात्र आता मुंबईत रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसतोय.
हेही वाचा :
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते
VIDEO: मुंबईकर काही ऐकेनात, सलग 15 व्या दिवशी लोकलला प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा
Mumbai Corona | मुंबईत 10 हजार 797 मजले सील, सर्वाधिक मायक्रो कंटेनमेंट झोन कोणत्या वॉर्डमध्ये?
व्हिडीओ पाहा :