मुंबई : सत्तेत येताच काय केलं, याची जंत्रीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत वाचली. सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतंय. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते विधानसभेत बोलत होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा नागरिकांना लाभ होत आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रकल्पाचा शुभारंभ केला. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा फायदा घेतला. समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर असल्याचंही त्यांनी सांगितलं. अभिभाषणावर बोलाल अशी अपेक्षा होती. विरोधकांनी विरोधकासारखं बोललं पाहिजे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. आम्ही जे काम करतो ते तुम्हाला दिसत नाही, असा हल्लाबोलही शिंदे यांनी केला.
कांद्याच्या निर्णय चर्चेप्रमाणे घेतला. नाफेडने खरेदी सुरू केली आहे. बांग्लादेशात निर्यात कर लावला आहे. रेल्वेने कांदा जातो. त्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलू. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. उच्च न्यायालयानं वैध ठरवला. महाविकास आघाडीच्या काळात त्याला स्थगिती मिळाली. तज्ज्ञ वकिलांची फौज आम्ही तयार करतोय. तोपर्यंत त्यांच्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. अडीच हजार नियुक्त्या देण्याचं काम केलं. मराठा समाजासाठी न्यायालयीन लढाई ताकदीनं लढत आहोत. सर्वांना सोबत घेऊन खंबीरपणे उभे राहिलो आहोत.
एक लाख ३७ हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक दावोसमधून येणार आहे. महाविकास आघाडीने १० हजार कोटींची गुंतवणूक आणली नाही. केंद्र आणि राज्य एकमेकांच्या विचाराने काम करत असल्याचं सांगितलं. परदेशी कंपन्या एमओयू साईन करतात त्यासाठी देशातीलही कंपन्या लागतात. नियमानुसार गुंतवणूक केली गेली. परदेशी गुंतवणूक येत आहे. एक लाखापेक्षा जास्त रोजगार मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात उद्योग आले पाहिजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. एनर्जी सेक्टरमध्ये गेल्यावेळी एमओयू ५० हजार कोटी रुपयांचा झाला होता. पण, तिथून एकही रुपयाची गुंतवणूक झाली नाही. आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत.