‘तुम्ही पिंक कलरची साडी का नेसली?’; अजितदादांचा उलटा सवाल; मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं?

| Updated on: Aug 15, 2024 | 6:35 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एएनआय’ संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना परत एकदा गुलाबी जॅकेटवरून विचारण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी मुलाखत घेणाऱ्यांनाच तुम्ही पिंक कलरची साडी का नेसली? असा सवाल केला.

तुम्ही पिंक कलरची साडी का नेसली?; अजितदादांचा उलटा सवाल; मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं?
Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. माध्यमांमध्येही अजित पवारांना या जॅकेटवरून ते अनेकदा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दादांनी त्यांच्या हटके अंदाजामध्ये उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच अजित पवार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये मुलाखत घेणाऱ्या महिलेने त्यांना गुलाबी जॅकेटवरून विचारलं? त्यानंतर अजित पवारांनी त्यांनाच तुम्हीपण पिंक कलरची साडी का नेसली असा उलटा सवाल केला. अजितदादा आणखी काय म्हणाले जाणून घ्या.

तुम्ही पिंक कलरची साडी का नेसली. तुम्हाला आवडली म्हणून घातली ना. तसंच मलाही वाटलं म्हणून मी पिंक कलरचा ड्रेस घातला. कलरवर आकर्षित होत नसतात. हा रोज पिंक आहे, हा जांभळा कलर आहे. यात काही अँगल नाही. कोणतीही स्टॅटेजी नाही. चंद्राबाबू नायडू पिवळा रंग आवडतो. तो ते वापरतात तर मला पिंक कलर आवडला. मला आवडला म्हणून मी हा रंग वापरतो. अजित पवार जे मनात येतं ते करतो विधान करतानाही कोणता विचार करत नाही, असं अजित पवार म्हणाले. या मुलाखतीवेळी अजित पवारांनी आणकी काही मुद्द्यांवर भाष्य केलं.

माझ्या मनात जे येतं ते मी बोलतो. मी ३५ वर्षापासून राजकारणात आहे. मला कुणी तरी विचारलं. मी निवडणुकीनंतर बराच विचार केला. हे कसं झालं. का झालं. त्याला मीच जबाबदार आहे. मी कुणाला दोष देत नाही. मला असं नव्हतं करायला पाहिजे, कुटुंबासाठी माझा निर्णय चुकीचं होतं. आमचे आजी आजोबापासून आम्ही सर्व एकत्र राहतो. त्यामुळे माझ्या मनात आलं. कुटुंबा कुटुंबात जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहिलो तरी कोणी तरी हरणार होतं. जिंकणारं आणि हरणारे कुटुंबातीलच होते. कुटुंबातील लोकांना त्रास होत होता. त्यामुळे मी बोलल्याचं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पत्नीला उभं करायचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाने ठरवलं. आमच्याकडे चारच जागा होत्या. त्यानंतर परभणीची जागा आम्हाला सोडावी लागली. धाराशीवची जागा घेतली. पण महायुतीचे उमेदवार आमदार होते राष्ट्रवादीचे नाही, असंही अजित पवार म्हणाले. त्यासोबतच आम्ही महाराष्ट्रात कमी पडलो. संविधान बदलण्याचा मुद्दा एवढा महागात पडेल असं वाटलं नव्हतं असंही अजित पवार यांनी सांगितलं.