महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी भाजप पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा कार्यक्रमात होत आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजन मांडलं. ज्यांच्या प्रेरणेने भारतात आम्ही काम करत आहोत असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पांना महाराष्ट्रात अस्तित्वात आणण्यासाठी या संकल्पपत्रातून होत आहे. संकल्प पत्र कागदाचा डॉक्युमेंट नाही. पूर्ण ताकदीने काम करण्यासाठीचं पवित्र डॉक्युमेंट आहे. आज १२ वाजता एक स्थगिती पत्र येणार आहे. या राज्यात ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यास रस आहे, अशा लोकांचं पत्र १२ वाजता येणार आहे. पण जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, भाजपवर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
आजचं संकल्पपत्रात अनेक गोष्टी आहेत. ज्या २५ गोष्टी आम्ही हायलाईट केल्या आहेत. त्यातील १० मुद्दे जो आम्ही महायुतीचा दहाकलमी कार्यक्रम घोषित केला. आम्ही लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देणार आहोत. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आम्ही भावांतर योजना आणणार आहोत. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्यावर्षी करून दाखवलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
प्रत्येक गरीबांना अन्न व निवाऱ्याचा हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध पेन्शन योजना १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार आहोत. आम्हीच ते १५०० रुपये केले होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासाठी मार्केट इंटरवेन्शन करणार आहोत. महाराष्ट्रात २५ लाख रोजगारांची निर्मिती करणार आहोत. त्यासोबत १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतनाच्या माध्यमातून लाभ देऊ. सरकार स्थापनेच्या १०० दिवसात व्हिजन डॉक्यूमेंट तयार करू. मेक इन महाराष्ट्राचं धोरण प्रभावीपणे राबवू, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
२५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. एफडीआय मध्ये ५२ टक्के महाराष्ट्राकडे आला आहे. त्यातून १० लाख विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी अग्रेसर असू.सरकारी नोकऱ्यांमधील निर्बंध गटात १ लाख पेक्षा जास्त नोकरी सरकारी क्षेत्रात दिल्या आहेत. सौर व अक्षय उर्जेचा वापर करून वीज बिलात ३० टक्क्यांवर सूट देणार आहेत. व्हिजन डॉक्युमेंट तयार करू. विज्ञानामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर ठेवणार आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’साठी प्रयत्न करणार आहोत. फिनटेक आणि एआय मध्ये मोठी गुंतवणूक करणार आहोत, असं म्हणत फडणवीसांनी व्हिजन मांडलं.