मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या भेटीला गेलेत. देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर (Raj Bhavan) दाखल झाले आहेत. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर मोठे पडसाद उमटले होते. महाराष्ट्राचं अवमान केलेलं वक्तव्य आहे, असं म्हटलं गेलं होतं. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात गोंधळ झाला. भाजपच्या नेत्यांनाही या वक्तव्याचा निषेध करावा लागला. भाजपच्या सर्व नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यपालांनी आज निवेदनाच्या माध्यमातून माफी मागितली आहे. राष्ट्रपतींकडूनही राज्यपालांना विचारणा करण्यात आली होती. राज्यपालांना समज देण्यात आली होती. त्यानंतर राज्यपालक कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस, शिवसेना या सर्वांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचं आपण समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मुंबईतील विकासाबाबत मराठी व्यक्तीला कमी लेखण्याचं काम राज्यपालांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांनीही आपण राज्यपालांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी माफी मागितली. या सर्व प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला जात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या विषयावर ते राज्यपालांशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीला विशेष महत्व आहे.
माझ्याकडून चूक झाली. संतांच्या भूमितील लोकं मला माफ करतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींकडून विचारणा झाल्यानंतर त्यांनी माफी मागितल्याचं सांगितलं जातं. या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल कोश्यांनी यांना भेटत आहेत.