नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊन पुन्हा वाढवावा लागणार नाही : अजित पवार

| Updated on: Apr 12, 2020 | 8:05 AM

सध्या गैरसोय होत असली, तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले. 

नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊन पुन्हा वाढवावा लागणार नाही : अजित पवार
Follow us on

मुंबई : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार (Lockdown In Maharashtra) रोखण्यासाठी राज्यातली लॉकडाऊन हे 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य (Lockdown In Maharashtra) देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.

राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली, तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले.

आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा काळ वाढवला आहे. लोकहितासाठी घेतलेल्या 30 एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनला राज्यातील जनतेनं सहकार्य करावं. प्रत्येकानं घरातंच थांबावं, डॉक्टर, पोलीस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं. हा लॉकडाऊन यशस्वी झाला, तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागणार नाही, याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानेच कोरानावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार (Lockdown In Maharashtra) यांनी केले आहे.

लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता राज्यात 14 एप्रिल नाही तर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा धोका पाहता तो आणखी पसरु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतेच

राज्यात काल (11 एप्रिल) कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1761 झाली आहे (Total Corona Patient in Maharashtra). आतापर्यंत 208 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना घरीही सोडण्यात आले आहे. तर 127 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

Lockdown In Maharashtra

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे