मुंबई : भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या, देवीरुपातील स्त्रीशक्तीचे (Ajit Pawar Appealed To Stay Safe) दररोज पूजन होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची उद्यापासून सुरुवात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Ajit Pawar Appealed To Stay Safe).
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाप्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन होईल. यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणाने आणि शक्यतो घरीच साजरा होईल, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. नागरिकांनी, देवीभक्तांनी उत्सवकाळात स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचे पूजन करण्याचा उत्सव आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीदुर्गामाता, श्रीअंबामाता, श्रीरेणुकामाता, श्रीलक्ष्मी, श्रीसरस्वती आदी रुपातील स्त्रीशक्तीचे पूजन करताना आपल्या कुटुंबातील, गावातील, शहरातील, समाजातील माता-भगिनींचाही सन्मान वाढवण्याचे काम झाले पाहिजे.
माता-भगिनींना त्यांचा हक्क, न्याय, सन्मान मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही, असा संकल्प आजच्या घटस्थापनेच्या निमित्ताने करुया, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
तुळजाभवानी नवरात्रोत्सव, प्रवेश बंदी, सीमेवर पोलीस बंदोबस्त, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोयhttps://t.co/Y9drIsmMLz#TuljaBhavaniTemple #Navratri2020 #Tuljapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2020
Ajit Pawar Appealed To Stay Safe
संबंधित बातम्या :
Photos | नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई