मुंबई : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क, टीव्ही 9 मराठी नव्या वर्षात नव्या रुपात प्रेक्षांकाच्या भेटीला आलं आहे. गल्लीपासून-दिल्लीपर्यंत, खेळाच्या मैदानापासून ते बॉलिवूडच्या सेटपर्यंत सर्व बातम्यांचं परिपूर्ण पॅकेज तुम्हाला टीव्ही 9 मराठीवर दररोज पाहायला मिळेल. आता दररोज संध्याकाळी 7 वाजता देश-विदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी तुम्हाला देश महाराष्ट्र (Desh Maharashtra TV9 Marathi) या बुलेटीनमध्ये पाहायला मिळेल. (Desh Maharashtra Bulletin daily 7 PM on TV9 Marathi)
संध्याकाळी 7 ची वेळ देश महाराष्ट्रची, महत्वाची खबरबात जाणून घेण्याची, असंच काहीसं स्वरुप तुम्हाला पाहायला मिळेल. देश महाराष्ट्र (Desh Maharashtra TV9 Marathi) या बुलेटीनमध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या घडामोडी, तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक बातमी पाहायला मिळेल. दररोज संध्याकाळी 7 वाजता देश आणि महाराष्ट्राच्या, मोठ्या बातम्यांचं बुलेटीन तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकाल.
यामध्ये गल्लीपासून दिल्लीचं राजकारण तर असेलच, शिवाय कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, गावखेडी अशा सर्व क्षेत्रातील बातम्या पाहता येतील. खेळाचं मैदान ते प्रत्यक्ष रणांगण, दिवसभरातील प्रत्येक अपडेट, प्रत्येक बातमी थोडक्यात आणि थेट तुम्ही देश महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये दररोज संध्या. 7 वा. पाहू शकाल.
(Desh Maharashtra Bulletin daily 7 PM on TV9 Marathi)