भाजपाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात घोषणांचा पाऊस पाडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीरनाम्यात मोठी तरतूद करण्यात आली आहे. लाडक्या बहिणीपासून, तरुण ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक घोषणा आहे. पण या संकल्पपत्रात भावांतर योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
काय आहे ही भावांतर योजना? तिचा काय होईल शेतकऱ्यांना फायदा?
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पपत्रात काय काय असेल याचा उल्लेख केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा संकल्प करण्यात आला आहे. तर मोफत वीज देण्यासाठी अगोदरच पावलं टाकल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांसाठी भावांतर योजनेची घोषणा करण्यात आली आहे. हमी भावापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांकडून खरेदी झाली तर फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने याविषयीचा निर्णय घेतला होता. पण आचारसंहितेमुळे या योजनेची अंमलबजावणी करता आली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिथे हमी भावाने खरेदी होणार नाही, तिथे भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना फायदा देऊ. हे मागच्या वर्षी करून दाखवल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे ज्या अन्नधान्यांची हमी भावाने खरेदी होईल. बाजारात त्यांना जर योग्य किंमत मिळाली नाही तर सरकार फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी तयार करणार
शेतकऱ्यांना मूल्य साखळी मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल हा प्रयत्न भाजपा करणार आहे. २०२७पर्यंत ५० लाख लखपती दिदी तयार करणार आहोत. स्किल सेन्सस करणार आहोत. शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र तयार करण्यात येणार आहे. नवीन उद्योजक तयार करण्यासाठी १५ लाखा पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी, ईबीसी, ईडब्लूसी, एससी एसटी यांना शिक्षण शुल्काची प्रतीपूर्ती करणार आहोत. युवांमध्ये फिटनेस असावा म्हणून स्वामी विवेकानंतर फिटनेस कार्ड सुरू करू. गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी प्राधिकरण करणार आहोत, असे ते म्हणाले.