Devendra Fadnavis : भोंग्याच्या बैठकीला गेले नाही पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली, तंतोतंत पालन व्हावं !

| Updated on: Apr 25, 2022 | 4:32 PM

आमच्या कार्यकर्त्यांवर, आणि आमच्या प्रतिनिधींवर दडपशाही होत असेल तर पोलिसांच्या बळाचा दुरुपयोग होत असेल तर महाविकास आघाडीने बोलवलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : भोंग्याच्या बैठकीला गेले नाही पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली, तंतोतंत पालन व्हावं !
महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) आणि त्यांच्या नेत्यांवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. हनुमान चालीसा इथं नाही म्हणायची तर काय पाकिस्तानात म्हणायची का असा सवाल उपस्थित करुन त्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची पाठराखणही केली. यावेळी त्यांनी शरद पवार, संजय राऊत यांच्यावरही राजकीय टीका केली. तसेच यावेळी त्यांनी हेही सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांवर, आणि आमच्या प्रतिनिधींवर दडपशाही होत असेल तर पोलिसांच्या बळाचा दुरुपयोग होत असेल तर महाविकास आघाडीने बोलवलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुणी हिटलर प्रवृत्तीने वागत असेल, तर त्यांच्याशी संवाद नाही, तर संघर्ष करावा लागतो अशी टीका करत त्यांनी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्लांबद्दलही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या पोलखोल रथावर हल्ले झाले,
आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारहाण झाली, हे केवळ मुंबईत नाही तर राज्यात सर्वत्र असे प्रकार सुरू आहेत.


केंद्रीय गृहसचिवांना पत्र

आमचा कार्यकर्ते दडपशाही सहन करीत असताना, पोलिसांचा दुरुपयोग होत असल्यामुळेच आम्ही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलीस ठाण्यासमोर हल्ला होतो, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे मी स्वतः केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिले आहे. ते योग्य दखल घेतील असा मला विश्वास आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर कारवाया

राज्याच्या गृहमंत्र्यांना कोणता अधिकार तरी आहे का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी या साऱ्या कारवाया मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहेत असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला.

हनुमान चालीसा पाकिस्तानात म्हणायची का?

हनुमान चालीसावरुन उठलेल्या वादंगावर त्यांनी कडाडून टीका करत म्हणाले की, एकाद्या गोष्टीचा किती द्वेष करायचा? आणि हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात म्हणायची? असा सवाल त्यांनी ठाकरे सरकारला केला. यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले मुळात हा राजद्रोह कसा होऊ शकतो? हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणू असंही त्यांनी सांगितले. मग त्यावर लावा आमच्यावर राजद्रोह असा रागही त्यांनी व्यक्त केला.

नवनीत राणा यांना हीन वागणूक

खासदार नवनीत राणा यांना कारागृहात अतिशय हीन प्रकारची वागणूक देण्यात आली आहे. त्या मागासवर्गीय समाजाच्या आहेत, याची त्यांना जाण करून देण्यात आली असल्याची प्रखर टीकाही त्यांनी आघाडी सरकारवर केली. यावेळी त्यांना प्यायला पाणीसुद्धा देण्यात आले नाही. एक महिला असताना त्यांना प्रसाधनगृहात जाऊ देण्यात आले नाही यावरुनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

…पण आम्ही संघर्ष करू

या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, केरळात, पश्चिम बंगालमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली. तिच स्थिती आज महाराष्ट्रात आहे. पण आम्ही संघर्ष करू आम्ही गप्प बसणार नाही असा सूचक इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत, पोलीस ठाण्यासमोर हल्ला होतो, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे मी स्वतः केंद्रीय गृहसचिवांना पत्र दिले आहे. ते योग्य दखल घेतील असा मला विश्वास आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई

Video Wardha Fire | वर्ध्यातील गादी कारखान्याला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान; काटोलमधील आगीत वृद्ध ठार