आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? नवाब मलिकांच्या दुखत्या नसवर फडणवीसांनी बोट ठेवलं

| Updated on: Oct 06, 2021 | 6:50 PM

आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. (devendra fadnavis reply to nawab malik over drug case)

आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? नवाब मलिकांच्या दुखत्या नसवर फडणवीसांनी बोट ठेवलं
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. मलिक यांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या दुखऱ्या नसवर मी बोट का ठेवू? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोल लगावला आहे. एनसीबी म्हटल्यावर मलिकांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. ड्रग्स होते की नाही पार्टी होते की नाही हे काढण्याऐवजी हा होता की तो होता हे ते सांगत आहेत. त्याची दुखरी नस वेगळीच आहे. त्यांच्या जखमेवरची खपली मला काढायची नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

भाजपची स्पेस वाढतच जाणार

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या निकालावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही. मी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारीह प्रचाराला गेलो नाही. तरीही आम्हालाच जनतेने निवडून दिले. 25 ट्केक जागा भाजपला मिळाल्या. 25 टक्के जागा अपक्षांना मिळाल्या आणि उरलेल्या 50 टक्के जागा आघाडीच्या तीन पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणजे त्यातही आम्हीच सरस आहोत. या निकालाने भाजप नंबर 1 पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत, असं फडणवीस म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेत आमची एक जागा गेली. पण पंचायतीत आम्ही चार जागा जिंकल्या याचा अर्थ जनतेने भाजपलाच जागा दिल्या आहेत. भाजपची स्पेस वाढतेय, तीन पक्षाची स्पेस कमी होत असून शिवसेना अधिकाधिक खाली जात आहे. भाजपची स्पेस वाढत आहे. आम्ही स्पेस वाढवतच जाणार आहोत. शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची स्पेस खाणार आहे. त्यामुळे कोण रसातळाला चाललंय हे निवडणुकीतून स्पष्ट झालं. त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

हा नाकाश्रू ढाळण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडीने लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खेद व्यक्त करणं ठिक आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा विचार केला असता तर पुरामुळे जो शेतकरी आक्रोशात आहे त्याचा विचार या शेतकऱ्यांनी केला असता. तरच हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असं म्हटलं असतं. पण त्याचा विचार न करता प्रस्ताव पास करणं म्हणजे हे संधीसाधू आहेत. हा नाकाश्रू ढाळण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली.

पवारांना टोला

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लखीमपूर हिंसेवरून सरकारवर टीका केली होती. त्यावरूनही त्यांनी टीका केली. हा राजकीय पोळी भाजण्याच प्रयत्न आहे. या दुर्देवी घटनेपेक्षा होणारं राजकारण दुर्देवी आहे. असं राजकारण करून काहीही फायदा होणार नाही. अशा घटनेतून फायदा होत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारला इशारा

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला. अतिवृष्टीग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही तर आम्ही आंदोलन करू. तीन पक्षाला सांगतो, लखीमपूर खीरीबाबत काय झाले हे ते सरकार पाहील. पण इथे लक्ष द्या. इथे रोज शेतकरी मरत आहेत. लखीमपूरवर बोलणारे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत अशी अवस्था आहे, असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

ZP Election Results 2021: नागपूर ते नंदूरबार काँग्रेसची सरशी, पालघरमध्ये सेनेचा झेंडा; धुळ्यात कमळ, अकोल्यात वंचितला कौल, वाशिममध्ये घड्याळाची टिक-टिक.

Photo : पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष! शिवसेनेपेक्षा भाजप सरस, तर राष्ट्रवादीला झटका

आघाडीला जिल्हापरिषद, पंचायत समितीत घवघवीत यश; रोहित पवार म्हणतात, आता…

(devendra fadnavis reply to nawab malik over drug case)