मुंबई : शुक्रवारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या सभेला आव्हान देत आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत सभा घेतली. या भेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या मुद्द्यांवरून टीका केली होती. त्या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. आता राजकारणाला एवढी फोडणी पडली असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या (Ajit Pawar) अडची वर्षा पूर्वीच्या पाहटेच्या शपथविधीचा मुद्दा कसा मागे राहिल. काल मुख्यमंत्र्यांनी त्यावरून टीका केली त्यानंतर आज फडणवीसांनी त्याच शपथविधीवरून पलटवार केलाय. माझा सकाळचा शपथविधी केला, तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण सकाळची शपथ यशस्वी झाली असती तरी माझ्या मंत्रिमंडळात वाझे नसता, दाऊदचा साथीदार नसता. वर्क फ्रॉम जेल चाललं आहे, त्यांचे फोटो छापले जात आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
तर पाच वर्षे तुम्ही आमच्यासोबत संसार केला. आमची संपत्ती घेऊन पळून गेलात आणि दुसऱ्यासोबत लग्न केलं. ऑफिशियल काडीमोड तरी घ्यायचा आणि म्हणे एकतर्फी प्रेम. अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. कालचं भाषण सोनियाजींना समर्पित होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसची भूमिका म्हणजेत कालचं भाषण होतं. माझा प्रश्न आहे की उद्धवजींना हे माहिती तरी आहे का डॉ. हेडगेवार यांचं नाव देशातील स्वातंत्र्यसेनानीमध्ये आहे. ज्यावेळी आणीबाणी लादली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही कुणाच्या बाजून होता. यांच्याकडे मुद्दा नसला की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र… कुणाच्या बापाची ताकद आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायची? असा सवालही त्यांनी केला आहे.
तसेच उद्धवजी सांगत होते सामनामध्ये सत्य छापलं जातं. मग तुम्ही 2014 मध्ये सामनातून सोनिया आणि पवारांबाबत सांगत होता ते सत्य होतं का? तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जे आश्वासन दिलं होतं ते खरं होतं का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. तर मुंबई वेगळी करायची आहे आम्हाला पण तुमच्या भ्रष्टाचारापासून, अनाचारापासून, दूराचारापासून, अन्यायापासून वेगळी करायची आहे. रस्ते, नाली, भूयार काहीच सोडलं नाही. हे भाषण शिवसैनिकासाठी होतं तसं ते सोनियांजींसाठी होती. काल म्हणाले संभाजीनगर मी म्हणतो म्हणजे झालं ना… ओ खैरे व्हा आता बहिरे… औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण कालच उद्धवजी म्हणाले मॅडम आमचा पाठिंबा काढू नका. आम्ही संभाजीनगर करत नाही आम्ही औरंगाबादच ठेवतो, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं आहे.