मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दोन तासांपासून सुरु असलेली चौकशी संपली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले. यानंतर तब्बल दोन तासानंतर हे पथक बंगल्याबाहेर पडलं आहे. यावेळी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर गर्दी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यापूर्वी 6 वेळा चौकशीसाठी नोटीस दिली होती. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले होते. 12 ते 2 या काळात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान सागर येथून बाहेर पडले आहेत.
दिलीप वळसे पाटील यांनी तुम्ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असं म्हटलंय. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल झाला होता. अज्ञात इसमानं राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यानं हा गुन्हा नोदं करण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा, गोपनियता कायदा याअतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. आतापर्यंत 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा नोटीस बजावण्यात आलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नोटीस म्हणजे समन्स नव्हे, असं देखील वळसे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती द्यायची कोणती नाही हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती. प्रश्नावलीची उत्तर त्यांनी दिली नव्हती. त्यामुळं आज पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
VIDEO: फडणवीसांना एक नव्हे सहावेळा नोटीसा, जबाब नोंदवणं यात काही गैर नाही: दिलीप वळसेपाटील
तर ठाकरे सरकारने दाऊदला महाराष्ट्र भूषण द्यावा- नितेश राणे
Devendra Fadnavis statement Mumbai Cyber Police recorded LOP statement in Confidential information leak case