फडणवीस अफझल खानच्या कबरीबाबत बोलले…; म्हणाले हे 2007 सालीच…

| Updated on: Nov 10, 2022 | 8:33 PM

प्रतापगडावरील अतिक्रमणासंदर्भात खरं तर म्हणजे 2007 साली न्यायालयाने निर्णय दिला होता की प्रतापगडावरील ही अतिक्रमणं काढली पाहिजेत.

फडणवीस अफझल खानच्या कबरीबाबत बोलले...; म्हणाले हे 2007 सालीच...
Follow us on

मुंबईः राज्यात शिवभक्तांकडून शिपप्रताप दिन साजरा केला जात असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने प्रतापगडावरी अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. या कारवाईबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस खरं तर आपल्याकरिता शिवप्रताप दिन हा अभिमानाचा दिवस आहे.

अफजलखानाचा वद झालेला अशा प्रकारचा दिवस आहे. प्रतापगडावर ज्या प्रकारचे अतिक्रमण करण्यात आले होते, त्या ठिकाणी या अगोदरच कारवाई केली पाहिजे होती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या कारवाई संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिक्रमणासंदर्भात खरं तर म्हणजे 2007 साली न्यायालयाने निर्णय दिला होता की प्रतापगडावरील ही अतिक्रमणं काढली पाहिजेत. मात्र त्यावेळी ही अतिक्रमणं आम्ही न काढता ती 2017 साली त्यासंदर्भातली कारवाई सुरू करण्यात आली होती.

मात्र त्यावेळी काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र आता या कारवाई संदर्भात कोणतीही समस्या नसल्याने गडावरील ही अतिक्रमणं काढण्यात येत आहेत. त्याबरोबरच या संदर्भात शिवप्रेमींचीही सातत्याने मागणी करण्यात येत होती ता मागणी या निमित्ताने पूर्ण झाल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवून शिवप्रेमींनी आंदोलन केलं त्यांच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गडावरील अतिक्रमणही काही केल्या निघत नव्हतं. मात्र आज ही अनाधिकृत अतिमक्रमणं काढण्यात येत असल्यानी आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे असंही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना नेत्यांच्या वक्तव्याबद्दल टिप्पणी करत, संजय राऊत यांच्या भेटीबद्दलही त्यांनी ते जर भेट घेणार असतील तर भेट नाकारण्याचं काय कारण नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.