मुंबईः महाराष्ट्रातील 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून शिवसेना-भाजप युती तुटली होती. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीचे चित्र समोर आले होते. मात्र आता त्यानंतर कितीतरी दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव घेतल्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधान आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या सत्ताधारी युतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र जनादेश मिळाल्यानंतरही सरकार स्थापन करण्याची मोठी कसरत सुरू झाली होती.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना सीएम पदाच्या खुर्चीवर बसवल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली होती. तर त्याचवेळी पहाटेच्या शपथविधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली,
तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देशातील राजकारणात जोरदार खळबळ उडाली होती.
या राजकीय घडामोडीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या राजकीय घडामोडीनंतर मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत आपल्या पक्षाच्या आमदारांना एकत्र केले.
तर त्यानंतर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देत या राजकीय नाट्याला पूर्णविराम दिला होता. मात्र आता तीन वर्षांनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आता शरद पवार यांचे नाव घेतल्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्ट्राच्या शिंदे सरकारमध्ये या संपूर्ण घटनेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तर पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एका टीव्ही चॅनलने आयोजित कलेल्या कार्यक्रमात दावा केला की, आम्हाला राष्ट्रवादीकडून एकत्र सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता,
तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावाबाबत स्थिर सरकारची गरज असून असे सरकार आपण मिळून बनवावे असंही त्यांनी यावेळी सांगण्यात आले होते.
राष्ट्रवादीकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करून पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस सांगितले. तर याबाबत शरद पवार यांच्याबरोबरही चर्चा झाली होती असा मोठा खुलासाही त्यावेळी त्यांनी केला होता.
तर त्यानंतर अजित पवार यांनी 80 तासांनंतर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मला राज्याला पूर्ण सत्य सांगायचे आहे की अजित पवार यांनी माझ्यासोबत प्रामाणिकपणे शपथ घेतली होती पण त्यानंतर राष्ट्रवादीची रणनीती बदलली असल्याचा मोठी खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा दावा फेटाळून लावला असून भाजपच्या वरिष्ठ नेत्याने असे खोटे दावे करू नयेत, असंही त्यांनी म्हटले आहे.
तर फडणवीस यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि सज्जन आहेत, असे मला वाटायचे. ते खोटेपणाचा अवलंब करून असे विधान करतील असे मला कधीच वाटले नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावरही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांचे अधिकृत ट्विटर हँडल एकामागून एक दाव्याच्या बाजूने आणि विरोधात ट्विट करण्यात येत आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर भाजपने ट्विट करत शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे समजूतदार व्यक्ती आहेत आणि त्यामुळेच ते आतापर्यंत गप्प राहिले, हे शरद पवारांनी विसरू नये, असे ट्विट महाराष्ट्र भाजपने केले आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार होऊ शकते हा संदेश तुम्हीच दिला होता.
महाराष्ट्र भाजपनेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला दुसरे काहीतरी हवे होते जे सापडले नाही आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय बदलला आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत महाराष्ट्र भाजपने म्हटले आहे की, शपथविधीच्या आदल्या रात्री अजित पवार यांच्याशी तुमचा कोणता वाद झाला?
महाराष्ट्र भाजपने ट्विट केले की, राजभवनात जाण्यापूर्वी अजित पवार यांनी सिल्व्हर ओक (शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान) येथे जाऊन पवारांची भेट घेतली होती,
आणि त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले होते असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेने राज्याच्या राजकारणात मात्र जोरदार चर्चेला उधान आले आहे.