मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांच्यामधील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांनीही वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले असून अटी आणि शर्तींची पूर्तता बाकी आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत. (Dhananjay Munde and live in partner files consent form to settle dispute)
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर वाच्यता केली होती. धनंजय मुंडे यांना लिव्ह-इन पार्टनर करुणा शर्मांपासून दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबत असलेले वाद सोडवण्यासाठी मध्यस्थ नियुक्त करण्यात आला आहे.
करुणा शर्मांविरोधात धनंजय मुंडे यांनी डिसेंबर 2020 मध्ये उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. करुणा यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. यामध्ये त्या स्वतः, धनंजय मुंडे आणि त्यांच्या दोन मुलांचे फोटो होते. त्यामुळे धनंजय मुंडेंनी कोर्टात धाव घेत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे निर्देश करुणा शर्मांना देण्याची विनंती केली होती.
धनंजय मुंडे यांनी करुणांकडून नुकसानभरपाईचीही मागणी केली होती. धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग आणि करुणा शर्मा यांचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती झाली असून दोघांनाही त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
धनंजय मुंडे यांनी मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मुंडेंवरच बलात्काराचा आरोप केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. मात्र, काही दिवसातच घरगुती वाद असल्याचं सांगत ही तक्रार मागेही घेतली होती. (Dhananjay Munde and live in partner files consent form to settle dispute)
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप रेणू शर्मा यांनी मागे घेतला. या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून धनंजय मुंडे भावनाविवश झाले. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले, तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले होते.
संबंधित बातम्या :
‘अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला घातले तरी उपकार फिटणार नाहीत’, धनंजय मुंडे भावनाविवश
Dhananjay Munde : जेसीबीतून फुलांची उधळण, धनंजय मुंडेंचं जंगी स्वागत
(Dhananjay Munde and live in partner files consent form to settle dispute)