मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या पार्श्वगायिका रेणू शर्मा (Renu sharma) यांनी तक्रार मागे घेतली आहे. त्यानंतर शर्मा यांनी तक्रार मागे घेताच त्यांचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी (Adv.Ramesh Tripathi) यांनीसुद्धा रेणू यांची केस सोडली आहे. (Adv.Ramesh Tripathi dropped the Renu sharma rape case)
धनंजय मुंडे यांच्यावर बलाताकाराचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊन मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आग्रही मागणी भाजपकडून केली जात होती. मात्र, त्यांनतर आता अचानक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यावेळी बोलताना हा आमचा कौटुंबिक वाद आहे. या प्रकाराला राजकीय वळण मिळाल्यामुळे मी ही तक्रार मागे घेतली असल्याचं रेणू शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांनी तक्रार मागे घेताच, ही केस लढवणारे त्यांचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी यांनी शर्मा यांची केस सोडली आहे.
रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यापासून अॅड. रमेश त्रिपाठी यांनी रेणू यांची बाजू लावून धरली होती. रेणू शर्मा यांच्यावर अत्याचार झाल्याचा दावा त्रिपाठी यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला होता. रेणू यांची केस घेतल्यामुळे मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याचंही त्रिपाठी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यामुळे रमेश त्रिपाठी यांनीसुद्धा केस सोडली आहे.
दरम्यान, रेणू शर्मा यांनी अचानकपणे तक्रार मागे घेणे हे धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या. अशा प्रकारामुळे खऱ्या बलात्कार पीडितांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. समाजात चुकीचं उदाहरण सेट होऊ शकतं, असेही वाघ म्हणाल्या. असे प्रकार भविष्यात घडू नयेत त्यामुळे रेणू शर्मा यांच्यावर करावाई करण्याची मागणीही यावेळी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.
संबंधित बातम्या :
धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे
धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, भाजपचे कृष्णा हेगडे म्हणतात ‘सत्यमेव जयते’
(Adv.Ramesh Tripathi dropped the Renu sharma rape case)