धनंजय मुंडेंवर माझा विश्वास, ते स्वत:च राजीनामा देतील: चंद्रकांत पाटील

| Updated on: Jan 14, 2021 | 3:03 PM

शरद पवार यांचे हे एकंदरीत वक्तव्य पाहता धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अटळ मानला जात आहे. | Chandkrant Patil

धनंजय मुंडेंवर माझा विश्वास, ते स्वत:च राजीनामा देतील: चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई: धनंजय मुंडे यांच्यावर माझा विश्वास आहे. ते आता स्वत:हूनच राजीनामा देतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच मौन सोडले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचे सांगत त्यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असे सांगितले होते. (Chandkrant Patil on Dhananjay Munde rape accusations)

शरद पवार यांचे हे एकंदरीत वक्तव्य पाहता धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अटळ मानला जात आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत भाजपचे नेते याप्रकरणात सावधपणे प्रतिक्रिया देत होते. मात्र, शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदलले आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काहीवेळातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडे स्वत:च राजीनामा देतील, असे म्हटले आहे. तर किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अतुल भातखळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

मी माझी भूमिका शरद पवार यांच्यासमोर मांडली आहे. आता पक्ष आणि शरद पवार योग्य तो निर्णय घेतील, असे धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. यानंतर धनंजय मुंडे जनता दरबार घेण्यासाठी रवाना झाले. दरम्यान, सध्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. काहीवेळापूर्वीच प्रफुल्प पटेल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकच्या दिशेने रवाना झाले आहेत.

 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही, आम्ही आमचा निर्णय घेऊ : शरद पवार

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवरील (Dhananjay Munde) आरोपांचं स्वरुप गंभीर आहे, आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. जे काही निर्णय घ्यावे लागतील, ते आम्हीच तातडीने घेऊ, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यामुळं आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल : शरद पवार

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले.

संबंधित बातम्या:

राजकारण्यांनी भान ठेवावं, धनंजय मुंडे प्रकरणात संजय राऊतांचं भाष्य

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? शरद पवार म्हणतात

मोठी बातमी: धनंजय मुंडेंना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार?

(Chandkrant Patil on Dhananjay Munde rape accusations)