Maharashtra Kesari 2023 | मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान ‘या’ जिल्ह्याला, स्पर्धा कधी कुठे?

| Updated on: Sep 04, 2023 | 10:41 AM

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची यासंदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार हा पाच दिवस चालणार आहे.

Maharashtra Kesari 2023 | मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान या जिल्ह्याला, स्पर्धा कधी कुठे?
फाईल फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्र केसरीच्या 65 वा स्पर्धेचा थराराची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यासंदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार हा पाच दिवस चालणार आहे. यंदाच्या स्पर्धेचा मान हा धाराशिव या जिल्ह्याला मिळाला आहे. यंदा धाराशिवमध्ये केसरी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.

कधी आणि कसे होणार सामने?

सर्व जिल्ह्यांमधून 450 खेळाडू माती आणि 450 खेळाडू गादी गटात असे 900 खेळाडू सहभागी होणार आहेत. माती आणि गादी असे 10 वेगवेगळे वजन असे 20 गटात ही स्पर्धा हणार आहे.  धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदा मिळत आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आयोजनाचा मान मिळाला असून तुळजाभवानी स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आणि धाराशिव कुस्ती तालीम संघाकडून हे आयोजन करण्यात आला आहे.

बक्षिसांची होणार बरसात?

महाराष्ट्र केसरीचा गदा जिंकणाऱ्या पैलवानाला चांदीची मानाची गदा वआणि 30 लाख रुपये किमतीची स्कर्पिओ गाडी मिळणार आहे. द्वितीय बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर 20 गटात स्पर्धा होणार असुन प्रत्येक गटातील प्रथमला बुलेट, रोख पारितोषिक उत्तेजनार्थ 12 लाख बक्षिसे देण्याता येणार असल्याची माहिती समजत आहे.  शरद पवार , देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते राहणार वेगवेगळ्या दिवशी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, 31 जूनला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत मानाच्या स्पर्धेचं आयोजन हे धाराविव जिल्ह्यात करावं अशी मागणी करण्यात आली होती. शेवटी महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्येच होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं.