मुंबई: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil )हे गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील, असे समजते. (Hasan mushrif and Ajit Pawar get new portfolio if Dilip Walse Patil take charge as new home minister)
सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते. मात्र, गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून तातडीने अनिल देशमुख यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
दुसरीकडे शरद पवार यांचे आणखी एक विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांचे नावही गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. त्यासाठी हसन मुश्रीफ तातडीने मुंबईला रवाना झाल्याचेही सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचा विचार गृहमंत्री नव्हे तर कामगार मंत्रालयासाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे खाते पूर्वी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे होते. तर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क खात्याचा कारभार हा अजित पवार स्वीकारतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
.@NCPspeaks .@PawarSpeaks will meet state unit president .@Jayant_R_Patil on Monday evening to discuss handing over of home ministry charge to senior minister
.@Dwalsepatil. Announcement is likely on Tuesday
.@fpjindia— Sanjay Jog (@SanjayJog7) April 5, 2021
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याकडे गृहखाते जाणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेचे आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?
आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!
हसन मुश्रीफ तातडेन मुंबईकडे रवाना, गृहमंत्रीपदाचा चार्ज जवळपास निश्चित!
(Hasan mushrif and Ajit Pawar get new portfolio if Dilip Walse Patil take charge as new home minister)