लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Sep 01, 2021 | 12:23 PM

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीच्या मुद्द्यावरून फटकारले आहे. (dilip walse-patil slams raj thackeray over dahi handi celebration)

लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका; दिलीप-वळसे पाटलांचा राज ठाकरेंना टोला
दिलीप वळसे-पाटील
Follow us on

मुंबई: गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दहीहंडीच्या मुद्द्यावरून फटकारले आहे. लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. (dilip walse-patil slams raj thackeray over dahi handi celebration)

दिलीप वळसे-पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा टोला लगावला आहे. सर्व जगात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट आली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये, असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं.

सहकार कायद्यासाठी विचार गट

सहकार कायद्याने काय परिणाम होणार? याबाबत आज चर्चा झाली. सहकार कायद्याने होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एक विचार गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, असं ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दहीहंडीसह सण उत्सव साजरा करण्याबाबत भूमिका मांडली होती. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू. आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल राज यांनी केला होता.

नियम सर्वांना सारखेच हवे

मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.

घंटानाद आंदोलन करू

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणातून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात. अस्वलाच्या अंगावर केस किती हे अस्वल मोजत नाही. आम्हीही मोजत नाही. सूडबुद्धीनेच सुरू आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं, असं सांगतानाच मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्ला राज यांनी केला. (dilip walse-patil slams raj thackeray over dahi handi celebration)

 

संबंधित बातम्या:

भाजपच्या भूमिकेला मनसेची पहिली साथ? मंदिर उघडण्यासाठी राज ठाकरे आक्रमक

तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष, राज ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका

दहीहंडीवरुन कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल, राज ठाकरे म्हणतात अस्वलाच्या अंगावरील केस मोजत नाहीत

(dilip walse-patil slams raj thackeray over dahi handi celebration)